गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 10:43 PM2020-02-14T22:43:44+5:302020-02-15T00:13:50+5:30
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत दरवाढ केल्याच्या निषेधार्थ येवला शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देण्यात आले.
येवला : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत दरवाढ केल्याच्या निषेधार्थ येवला शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देण्यात आले.
विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये केंद्र सरकारने १४५ रु पयांनी अन्यायकारक वाढ केली आहे. ही दरवाढ सलग सहाव्यांदा करण्यात आली असल्याने सर्वसामान्य जनतेला न परवडणारी आहे. यामुळे महिलांचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. तसेच आधीच महागाईमुळे कंबरडे मोडलेल्या सामान्य जनतेचे या दरवाढीमुळे जगणे मुश्कील झाले आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या अन्यायकारक दरवाढीचा येवला शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येऊन ही अन्यायकारक दरवाढ केंद्र सरकारने तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी अध्यक्ष राजश्री पहिलवान, नर्गिस शेख, अर्चना शिंदे, रेखा साबळे, मंगल घोडेराव, आयशा शेख, ज्योती थोरात, सुनीता गायकवाड, सुमनबाई भागवत, आस्मा शेख, रजिया शाह, शमीन तहसीन, शबाना शाह, रुबिना शाह, शबनम शेख, ज्योती जगताप, शकुंतला थोरात, मालनबाई गायकवाड, विठाबाई सोनार, छायाबाई खंडागळे आदी उपस्थित होते.