स्मारक भूमिपूजन निमित्ताने राष्ट्रवादीतील गटबाजी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:01 PM2021-02-06T18:01:49+5:302021-02-06T18:02:41+5:30
सटाणा : दोन दिवसांपूर्वी शहरातील देवमामलेदार यशवंत महाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त झालेल्या राज्यपालांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या स्वागताला पक्षाचे पदाधिकारी गैरहजर राहिल्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
सटाणा : दोन दिवसांपूर्वी शहरातील देवमामलेदार यशवंत महाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त झालेल्या राज्यपालांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या स्वागताला पक्षाचे पदाधिकारी गैरहजर राहिल्याने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ होते. प्रोटोकॉलनुसार बागलाणचे आमदार दिलीप बोरसे हे जरी भाजपचे आमदार असले तरी त्यांनी राज्यपाल यांच्यासह पालकमंत्री भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांचे स्वागत केले तर दुसरीकडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांनी सेनेचे मंत्री भुसे यांचे जंगी स्वागत केले. मात्र राष्ट्रवादीची जबाबदारी सांभाळणार्या स्थानिक पदाधिकार्यांनी भुजबळ यांच्या दौर्याकडे पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. त्यांच्या स्वागतासाठी ना पक्षाचे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी हजर राहिले ना कार्यक्रमाच्या ठिकाणी. स्थानिक पदाधिकार्यांच्या या भूमिकेमुळे समता परिषद व भुजबळ समर्थकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या कृतीमुळे राष्ट्रवादीतील गटबाजीही चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, एका पुढार्याने भाजप-सेनेचा हा कार्यक्रम असल्याने त्या कार्यक्रमाला कोणीही जाऊ नये असे फर्मान काढल्याची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे. त्या पुढार्याच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
कोट.....शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांना स्वतः व्यक्तिगत निमंत्रण देण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्यांना तसेच त्यांच्या पक्षाचे माजी आमदार यांनादेखील तीनवेळा आपण निमंत्रण दिले होते.
- सुनील मोरे, नगराध्यक्ष, सटाणा