माकपाच्या गडाला राष्टÑवादीचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:29 PM2020-08-24T22:29:56+5:302020-08-25T01:13:52+5:30
सुरगाणा : कोणत्याही प्रकारचा विकास होत नसल्याचा आरोप करत भवाडा गटातील माकपाच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी पळसन येथे राष्टÑवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
सुरगाणा : कोणत्याही प्रकारचा विकास होत नसल्याचा आरोप करत भवाडा गटातील माकपाच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी पळसन येथे राष्टÑवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत इगतपुरी येथील अनिता बोडके या तालुकाबाह्य उमेदवारावर विश्वास ठेवून निवडून दिले होते. मात्र विकासकामे तर दूरच; पण इगतपुरी सोडून जिथून निवडून आल्या त्या भवाडा गटात कधी त्या फिरकल्या नाहीत. ज्यांनी निवडून दिले त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत, विकासकामे झाली नाहीत, यामुळे नाराज असलेल्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आमदार पवार यांच्या हस्ते पळसन चौफुलीवर पक्षाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी जयकुमार माळी, गुलाब गवळी, नामदेव चौधरी, नंदराज गावीत, अनिल गवळी, राजेश गवळी उपस्थित होते.भवाडा गटात पाणीटंचाई, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शासकीय आश्रमशाळेतील कमर्चारी निवासस्थान, दळणवळण आदींसह महत्त्वाचे म्हणजे गेली काही वर्षे पळसन परिसरात मोबाइल सुविधा नाही. मोबाइल असूनही अडीअडचणीला फोन करू शकत नाहीत. युवकांना विकास व हाताला काम पाहिजे आहे, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.