स्थापनेपासून राष्टवादीचे अस्तित्व टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:25 AM2019-09-26T01:25:07+5:302019-09-26T01:26:14+5:30

विदेशी नागरिकत्व व पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून १९९९ मध्ये बाहेर पडलेल्या राष्टवादी काँग्रेसने गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यातील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. राष्टवादीच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसला घरघर लागली. अवघ्या काही काळातच राष्टवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर कब्जा केला तर याच काळात राष्टवादीने राज्याच्या सत्तेला दिलेली धडक व राज्याच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान मिळाले.

 Nationalist survival since its inception | स्थापनेपासून राष्टवादीचे अस्तित्व टिकून

स्थापनेपासून राष्टवादीचे अस्तित्व टिकून

Next

नाशिक : विदेशी नागरिकत्व व पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून १९९९ मध्ये बाहेर पडलेल्या राष्टवादी काँग्रेसने गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यातील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. राष्टवादीच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसला घरघर लागली. अवघ्या काही काळातच राष्टवादीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर कब्जा केला तर याच काळात राष्टवादीने राज्याच्या सत्तेला दिलेली धडक व राज्याच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान मिळाले.
नाशिक जिल्हा अनेक वर्षे कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असताना १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेमुळे या पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. शरद पवार यांनी कॉँग्रेसमधून बाहेर पडताच, त्यांच्यासोबत कोण कोण नेते येतात व कोणत्या जिल्ह्यातून समर्थन मिळते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. पवार यांचा निर्णय जाहीर होताच, सर्व प्रथम नाशिकमध्ये पवार समर्थकांची बैठक झाली व त्यात शरद पवार यांच्यापाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात सर्वच कॉँग्रेसजन होते.
प्रत्यक्ष राष्टवादीची स्थापना झाल्यानंतर अन्य पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. नाशिकच्या रूपाने छगन भुजबळ हे पहिले प्रदेशाध्यक्ष झाले. भुजबळ यांचे आजोळ नाशिक असल्यामुळे त्यांनीही जिल्ह्यात पक्षाच्या वाढीला प्राधान्य दिले.
पक्षाची स्थापना झाल्या झाल्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागल्याने नाशिक मतदारसंघात राष्टवादीने स्व. डॉ. वसंत पवार यांना उमेदवारी दिली. तिरंगी लढतीत त्यांचा पराभव झाला असला तरी, राष्टवादीने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. ग्रामीण भागात मात्र राष्टÑवादीला पहिल्याच दणक्यात चार जागांवर विजय मिळाला. दोन्ही कॉँग्रेसने एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली.
सत्तेत राष्टवादी सहभागी झाल्याने त्याचा फायदा पक्ष वाढीस झाला. सन २००४ मध्ये छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी थेट येवला मतदारसंघाची निवड केली. त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्रिपद तसेच दहा वर्षे मंत्रिपद कायम राहिले.
मोदी लाटेतही चार जागा
जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, बागलाण, नांदगाव, येवला, कळवण या आदिवासी मतदारसंघांमध्ये स्व. ए. टी. पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्टवादीने मुसंडी मारली. अवघ्या दहा वर्षांत पक्षाचे स्वमालकीचे अद्ययावत कार्यालयही नाशकात उभे राहिले. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, साखर कारखाने, सहकारी बॅँका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा शिरकाव झाला. सन २०१४ मध्ये देशात मोदी लाट असतानाही राष्टÑवादीने विधानसभा निवडणुकीत चार जागांवर विजय कायम ठेवून ही लाट रोखण्यात हातभार लावला, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघांत दुसºया क्रमांकाची मते घेत आपले अस्तित्व कायम ठेवले.

Web Title:  Nationalist survival since its inception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.