नाशिकची मृण्मयी केंगे चित्रस्पर्धेत देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:45 PM2018-08-09T15:45:25+5:302018-08-09T15:47:56+5:30

मधुबनी शैलीतील चित्राला पुरस्कार

 Nation's Mrinalay Kange painting competition tops the country | नाशिकची मृण्मयी केंगे चित्रस्पर्धेत देशात अव्वल

नाशिकची मृण्मयी केंगे चित्रस्पर्धेत देशात अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देमधुबनी शैलीतील चित्राला पुरस्कार

नाशिक- येथील मृण्मयी अनुराग केंगे हिने कॅमलिन चित्रकला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम क्रमांक मिळवून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या यशाद्वारे तीने नाशिकचे नाव देशपातळीवर नेले आहे. या स्पर्धेत ५० लाख ७० हजार ६८० विद्यार्थी बसले होते. त्यातुन प्राथमिक, विभागीय व अंतिम फेरीसाठी ९७ विद्यार्थी निवडले गेले. मृण्मयीने ‘बिझनेस इन डायव्हर्सीटी’ हा विषय निवडला होता. त्यामध्ये तिने पर्यावरण आणि पर्यावरण पूरक व्यवसायाचा परस्पर संबंध मधुबनी शैलीत साकारला आहे. त्यासाठी तिला मानचिन्ह मिळाले आहे. या स्पर्धेतील अकरावी व बारावीचा हा गट असून आधी या विद्यार्थ्यांची निवड विभागीय पातळीवर झाली होती. त्यात मृण्मयीचा दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. आपले व्यवसाय पर्यावरणपूरक असावेत, जेणेकरुन पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही, अशी संकल्पना या चित्रामागे आहे.
मृण्मयी ही नाशिकचे चित्रकार सुहास जोशी यांची विद्यार्थीनी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिला अनेक भारतीय चित्रशैलींची ओळख झाली आहे. मृण्मयी सध्या आर्कीटेक्चरचा अभ्यास करत आहे.

Web Title:  Nation's Mrinalay Kange painting competition tops the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.