नाशिकच्या अभियंता शाखेला सलग चौथ्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:28 AM2018-11-12T00:28:41+5:302018-11-12T00:29:14+5:30
गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दी इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्स (अभियंता शाखा) नाशिक शाखेला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सलग चौथ्या वर्षी पुरस्कार मिळवणारी नाशिक शाखा सर्वोत्कृष्ट ठरली आहे.
सातपूर : गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दी इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्स (अभियंता शाखा) नाशिक शाखेला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट सेंटरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सलग चौथ्या वर्षी पुरस्कार मिळवणारी नाशिक शाखा सर्वोत्कृष्ट ठरली आहे.
इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनियर्स या संस्थेच्या संपूर्ण भारतात शाखा असून, शाखांच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय तसेच विविध क्षेत्रात काम करणाºया अभियंत्यांसाठी अनेक उपक्र म राबविले जातात. नाशिक सेंटरचे अध्यक्ष संतोष मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध तांत्रिक उपक्र म, चर्चासत्रे, राष्ट्रीय स्तरावरील उपक्र म, तसेच बॅचलर आॅफ इंजिनिअरिंगशी समकक्ष असलेल्या एएमआयई परीक्षेचे आयोजन आणि मार्गदर्शन, ग्रीन बिल्डिंग, तसेच नाशिकचे सेंटर पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारे सेंटर आहे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पही उभारण्यात आला आहे. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेण्यात येऊन त्यांना गौरविण्यात आले. रांची येथे आयोजित शानदार कार्यक्र मात खारगपूर आयआयटीचे पद्मश्री प्रा. एजॉयकुमार रॉय, रेल्वेबोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल, अभियंता शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष टी. एम. गुणराजा, शिशिरकुमार बॅनर्जी यांच्या हस्ते नाशिक सेंटरचे अध्यक्ष संतोष मुथा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
देशातील २९ राज्यांतील ८५ अभियंता शाखांच्या सेंटरमधून नाशिकच्या अभियंता शाखेची निवड करण्यात आली आहे. यापूर्वीच नाशिकच्या सेंटरला स्मार्ट सेंटर म्हणून गौरविण्यात करण्यात आले आहे. गेल्या ७ वर्षांत ६ वेळा तसेच सलग ४ वेळा नाशिकच्या सेंटरला देशातील सर्वोत्कृष्ट सेंटर म्हणून गौरविण्यात आले आहे.