स्वत:पेक्षा राष्ट्राचे स्थान महत्त्वाचे पंडित : चांडक-बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:38 AM2018-01-07T00:38:48+5:302018-01-07T00:39:41+5:30
नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण न करता लोककल्याण म्हणून राज्य केल्याने त्यांना लोककल्याणकारी राजा म्हटले जाते.
नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण न करता लोककल्याण म्हणून राज्य केल्याने त्यांना लोककल्याणकारी राजा म्हटले जाते. मराठ्यांमध्ये जी ऊर्जा होती त्याचा मूळ स्त्रोत शिवराय होते. शिवरायांचे विचार आदर्शवत असून, स्वत:पेक्षा राष्टÑ महत्त्वाचे हे धोरण प्रत्यक्ष अमलात आणले पाहिजे, असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित यांनी केले.
चांडक-बिटको महाविद्यालयात दोनदिवसीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि आधुनिक काळातील त्यांचा संदर्भ या विषयावरील राष्टÑीय परिषदेच्या समारोप सत्रात अध्यक्ष पदावरून प्राचार्य पंडित बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. एस.जी. देवधर, उपप्राचार्य डॉ.डी.जी. बेलगावकर, प्राचार्य राम कुलकर्णी, डॉ.ए.आर.पठारे, प्रा. जयंत भाभे, डॉ. महेश औटी, डॉ. मंजुषा कुलकर्णी आदी उपस्थित होते. सकाळच्या दोन सत्रात शिवाजी महाराज आणि किल्ले प्रशासन, राजनीती या विषयांवर डॉ. विनायक गोविलकर, गिरीश टकले, उद्योजक धनंजय बेळे, पांडुरंग बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० प्राध्यापकांनी संशोधनपर प्रबंध सादर केले. यावेळी प्राचार्य राम कुलकर्णी यांनी दोन दिवसीय परिषदेतील आढावा सादर केला. तर डॉ. डी. जी. बेलगावकर यांनी ५ सत्रांचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन प्रा. विजया धनेश्वर, डॉ. शायोन्ती तलवार यांनी केले व आभार प्रा. जयंत भाभे यांनी मानले. भारत इतिहास परिषद पुणेचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी शिवरायांचे जीवनकार्य व विचार केवळ अभ्यासापुरते नसून प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज आहे. शिवरायांनी आरमार उभारून सागरावर परकीयांच्या वर्चस्वाला आव्हान दिले. त्यांची रणनीती-राष्टÑधर्म हा प्रथम धर्म होता. शिवरायांचे युद्धतंत्र तर अचंबित करणारे होते, असे बलकवडे यांनी स्पष्ट केले.