ग्रामसभेला भांडणाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:10 PM2018-12-16T17:10:36+5:302018-12-16T17:11:09+5:30
वरखेडा-- दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ग्रामपंचायतीच्याशनिवारीरात्रीझालेल्यासभेलाभांडणाचेस्वरूपआल्यानेकोणताहीनिर्णयनघेतासभाआटोपतीघेण्यातआली.मंगळवारदि.११ रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने अचानक फतवा काढून मंगळवारी रात्री साडेआठ वाजता दारू विक्र ी परवाना मिळवण्यासाठी च्या अर्जदारांच्या संदर्भात महिला ग्रामसभा आयोजित केली होती. परंतु मंगळवारी रात्रीच्या वेळी महिला ग्रामसभेला पुरेशा महिला उपस्थित नसल्याने सदरील दारू परवाना विषय नाईलाजास्तव ग्रामपंचायत प्रशासनातर्फे स्थिगत करण्यात आला. परंतु मंगळवारी स्थगिती दिलेला दारू परवाना चा विषयाला पुन्हा वाट करण्यासाठी चिंचखेड ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारी (दि.१५) रोजी पुन्हा ग्रामसभा आयोजित करण्यात आली.
वरखेडा-- दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ग्रामपंचायतीच्याशनिवारीरात्रीझालेल्यासभेलाभांडणाचेस्वरूपआल्यानेकोणताहीनिर्णयनघेतासभाआटोपतीघेण्यातआली.मंगळवारदि.११ रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने अचानक फतवा काढून मंगळवारी रात्री साडेआठ वाजता दारू विक्र ी परवाना मिळवण्यासाठी च्या अर्जदारांच्या संदर्भात महिला ग्रामसभा आयोजित केली होती. परंतु मंगळवारी रात्रीच्या वेळी महिला ग्रामसभेला पुरेशा महिला उपस्थित नसल्याने सदरील दारू परवाना विषय नाईलाजास्तव ग्रामपंचायत प्रशासनातर्फे स्थिगत करण्यात आला. परंतु मंगळवारी स्थगिती दिलेला दारू परवाना चा विषयाला पुन्हा वाट करण्यासाठी चिंचखेड ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारी (दि.१५) रोजी पुन्हा ग्रामसभा आयोजित करण्यात आली. सदरील ग्रामसभा कोणत्या विषयासाठी आयोजित केली असे ग्रामस्थांनी ग्राम विकास अधिकारी तांबे यांना विचारणा केली असता आजची ग्रामसभा फक्त ग्रामपंचायतला आलेल्या दारू विक्र ी परवाना अर्जावर निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली असल्याचे ग्राम विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
दारू विक्र ी परवाना अर्जावर निर्णय प्रक्रि या होत असताना हा निर्णय बहुतांश ग्रामस्थांना मान्य नसल्याने त्यांनी या अर्जाला परवानगी देण्यास विरोध दर्शविला. ग्रामसभेत दारू परवाना मिळण्यासाठी विरोध होत असल्याने अर्जदाराने चिंचखेड ग्रामस्थांना अरेरावीची भाषा करत ग्रामस्थांना दडपशाहीने ठराव मंजुरीसाठी प्रयत्न केला असता बहुतांश ग्रामस्थांनी सदरील विषयावरील अंतिम निर्णय न घेण्याचे ठरवले. तसेच दारू विक्र ी परवाना अर्जाला मंजुरी देण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर ग्रामसभेला भांडणाचे स्वरूप प्राप्त होऊन सभेला गालबोट लागले.
ग्रामसभेमध्ये उपस्थित अर्जदार आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये दारू विक्र ी परवाना विषयासंदर्भात बाचाबाची होऊन ग्रामसभेला प्रचंड राड्याचे स्वरूप प्राप्त झाले.त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी सदरील विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे आज झालेल्या ग्रामसभेत संबंधित विषयावरील कुठलाही अंतिम निर्णय न होता ग्रामसभा संपवण्यात आली.