चिंचबनवाडी परिसरात निसर्ग फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 02:34 PM2020-07-25T14:34:26+5:302020-07-25T14:35:05+5:30
नांदूरशिंगोटे : हिरवाईने नटलेला डोंगर, जमिनीवर गवताच्या पसरलेला हिरवा शालू, खळखळणारे ओढे, उंचावरून पाणी पडताना दिसणारे धबधबे आणि पक्ष्यांचा किलबिलाट, असे हे मनमोहक सौंदर्य सध्या चिंचबनवाडी परिसरात पहायला मिळत आहे.
नांदूरशिंगोटे : हिरवाईने नटलेला डोंगर, जमिनीवर गवताच्या पसरलेला हिरवा शालू, खळखळणारे ओढे, उंचावरून पाणी पडताना दिसणारे धबधबे आणि पक्ष्यांचा किलबिलाट, असे हे मनमोहक सौंदर्य सध्या चिंचबनवाडी परिसरात पहायला मिळत आहे. नांदूरशिंगोटे व नळवाडी शिवाराच्या मध्यवर्ती भागात हा परिसर असून या भागात मोठ्या प्रमाणात वनविभागाचे जंगल आहे. प्रामुख्याने या भागात आदिवासी समाज वास्तव्य करत आहे. त्यामुळे सदरचा परिसर दुर्लक्षित आहे. स'ाद्रीच्या पर्वत रांगा या भागातून गेल्या असून डोंगराळ भाग असल्याने सर्वत्र निसर्गमय वातावरण तयार झाले आहे. यावर्षी पावसाने चिंचबन हिरवागार झाला आहे. नाले खळखळू लागले आहेत. छोटे-मोठे धबधबे वाहने सुरु झाले आहे. या निसर्गसौंदर्याला नजरेत साठविण्यासाठी येणारे पर्यटक मात्र, कोरोनाच्या प्रभावामुळे वंचित राहत आहेत. पूर्वेकडील डोंगरावरुन वाहणारा धबधबा निसर्ग सौंदर्यात भर घालतात आहे, तर हिरव्यागार निसर्गामुळे पशुपक्षी आनंदी असल्याचे त्यांच्या किलबिलाट करून स्पष्टपणे जाणवते. एकीकडे कोरोनामुळे मनुष्यप्राण्याच्या फिरण्याला मर्यादा पडल्या आहेत. परिणामी, निसर्गाचा आंनद घेण्यासाठी थोड्याफार प्रमाणात युवक या भागात फेरफटका मारताना दिसत आहे.