निसर्गामुळेच आरोग्य रक्षण शक्य : सोमय्या
By Admin | Published: October 19, 2015 10:27 PM2015-10-19T22:27:42+5:302015-10-19T22:29:09+5:30
निसर्गामुळेच आरोग्य रक्षण शक्य : सोमय्या
नाशिक : निसर्ग हा मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याविरुद्ध जाऊन माणसाचा विकास होऊ शकत नाही. निसर्गामुळेच मानवाच्या आरोग्याचे रक्षण शक्य आहे, असे मत सुधीर सोमय्या यांनी व्यक्तकेले.
वनबंधू परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यक्रमात ‘निसर्गोपचार’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, वनबंधू परिषदेचे नेमिचंद पोद्दार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. निसर्गाच्या संवर्धनामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कोणताही रोग होण्यापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगून सोमय्या यांनी निसर्गाेपचाराचे महत्त्व सांगितले.
यावेळी आमदार फरांदे यांनी वनबंधू परिषदेच्या एका शाळेचा खर्च दिला. तसेच अन्य मान्यवर नागरिकांनी २५ एकल शाळा चालविण्यासाठी मदत दिली. प्रास्ताविक सुनील चांडक यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अविनाश आव्हाड यांनी
केले. (प्रतिनिधी)