‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 09:36 PM2020-06-03T21:36:11+5:302020-06-04T00:42:58+5:30

नाशिक : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे मंगळवारी (दि. २) रात्रीपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी (दि. ३) दिवसभर कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पाऊसधारा कोसळल्या. या पावसामुळे सप्तशृंगी गडावर दरड कोसळली.

‘Nature’ collapses due to cyclone | ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोसळधार

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोसळधार

Next

नाशिक : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे मंगळवारी (दि. २) रात्रीपासूनच जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी (दि. ३) दिवसभर कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पाऊसधारा कोसळल्या. या पावसामुळे सप्तशृंगी गडावर दरड कोसळली. कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने मार्गावरील वाहतूकही बंद आहे. त्यामुळे सुदैवाने हानी झाली नाही. पावसामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेला कांदा भिजला तर शेतमाल वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळही उडाली होती. सप्तशृंग गडावर बुधवारी (दि. ३) सकाळच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
नांदुरी ते सप्तशृंगगड दहा किलोमीटरचे अंतर असून, नांदुरीपासून पाच किलोमीटर अंतरावर गणपती घाट आहे. त्याठिकाणी सकाळी
९ वाजेच्या दरम्यान दरड कोसळण्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले. सध्या कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. दरड कोसळण्याच्या घटनेमुळे सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाच्या संदर्भात प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे कोणतेही वाहन या कालावधीत नसल्याने दुर्दैवी घटना टळली. मोठ्या आकाराचे दगड दूर करण्यास प्रथमत: जेसीबीला अडचण आली. पाऊस व निसरड्या रस्त्यामुळे चालकाला तारेवरची कसरत करावी लागली. अर्धा ते पाऊण तासानंतर रस्ता पूर्ववत करण्यात आला.
-------------------------
दिंडोरीत भाजीबाजारात चिखल
दिंडोरी : तालुक्यात ढगाळ वातावरण होत मंगळवारी रात्रीपासून अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू असून, संभाव्य वादळाच्या भीतीने दिंडोरीतील बाजारपेठ दुपारी ३ वाजता बंद करण्यात आली. रिमझिम पावसामुळे सिडफार्मच्या जागेत भरणाºया भाजीपाला फळ बाजारात चिखल तयार होत व्यापारी व नागरिकांचे प्रचंड हाल झाले. सोमवारी सायंकाळी दिंडोरीच्या पश्चिम भागात वादळी वाºयासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. प्रशासनाने पुढील तीन चार दिवस वादळी वारा व मुसळधार पावसाचा इशारा देत नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले होते. मंगळवारी दुपारपासून वातावरणात बदल होत ढगाळ वातावरण झाले. रात्री काही काळ रिमझिम पाऊस झाला. बुधवारी ढगाळ वातावरण कायम राहत वाºयाचा वेग तुरळक वाढला व अधूनमधून रिमझिम पाऊस पडत होता. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी निसर्ग चक्र ीवादळ अलिबाग किनाºयालगत पोहचताच प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा देत दुकाने बंद करण्यास सांगितले. यावेळी ग्राहक व व्यावसायिकांची तारांबळ उडाली.
-----------------------------
मालेगावी पावसाची संततधार
मालेगाव : शहर परिसरात बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. दुपारनंतर वीजपुरवठा खंडित झाला; मात्र निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. पावसामुळे शहरातील विविध कॉलनी आणि वसाहतींचा परिसर जलमय झाला होता. दरम्यान, गुरुवारी (दि. ४) करण्यात येणारा पाणीपुरवठा वीजपुरवठा खंडित झाल्याने वेळेवर होऊ शकणार नाही अथवा शहरात पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, असे आवाहन महापालिकेने केले.
-----------------------------------
गोदाकाठ भागात पाऊसधारा
सायखेडा : निसर्ग चक्रीवादळामुळे गोदाकाठ भागात सलग दोन दिवस रिमझिम पाऊस, जोराचा वारा सुटल्याने हवेमध्ये प्रचंड गारवा पसरला आहे. जोरदार वारा सुटल्याने म्हाळसाकोरे सबस्टेशन अंतर्गत येणाºया गावांमध्ये दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी मिळाले नाही. अनेक शेतकºयांना आपल्या विहिरींवर रहाटाच्या साह्याने पाणी ओढावे लागले. गोदाकाठ भागातील शेतकºयांची अचानक आलेल्या पावसाने आणि वाºयाने नागरिकांची धावपळ उडाली. शेतात उभा असलेला जनावरांचा हिरवा चारा भुईसपाट झाला तर बाहेर पडलेला कांदा पावसात भिजला. कोरोनाचे संकट उभे असताना चक्रीवादळाचे संकट उभे राहिल्याने नागरिकांनी धास्ती घेतली.
-------------------------
चांदवडला वाºयासह पाऊस
चांदवड : शहर व परिसरात मंगळवारी (दि.२) रात्री साडेबारा वाजेपासून पावसास सुरुवात झाली. सकाळपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण कमी झाले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, शेतकरी, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेबरोबर थंड वारे वाहताना दिसत होते.

Web Title: ‘Nature’ collapses due to cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक