पिंपळगाव बसवंत परिसरातील महामार्गाला तलावाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:37 PM2019-09-26T22:37:37+5:302019-09-26T22:37:56+5:30
पिंपळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३ ची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाल्याने गुरु वारी (दि.२६) सतत जोराने पडणाऱ्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर काहीकाळ पाणी साचून तलावाचे स्वरूप आल्याने येणाºया-जाणाºया वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला .

परिसरातील महामार्गाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने याचा परिणाम म्हणून पाऊसामुळे या ठिकांनी असलेल्या मोठ मोठ्या खड्यात पाणी साचून खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती निर्माण झाले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पिंपळगाव शहर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे वातावरणात झालेला कमालीचा बदल पाहता जोरदार झालेल्या पावसामुळे नागरिकांना आता गारव्याला सोमोरे जावे लागत आहे. या जोरदार झालेल्या पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. महामार्ग प्राधिरकणाचे याकडे दुर्लक्ष असल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.