झाकीर हुसेन रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:15 AM2021-04-22T04:15:37+5:302021-04-22T04:15:37+5:30
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात दुपारी दीड वाजेच्या सुमारास दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी पाचारण करण्यात आली. यासह पोलीस ...
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात दुपारी दीड वाजेच्या सुमारास दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी पाचारण करण्यात आली. यासह पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलीस बंदोबस्ताचा आढावा अधिकाऱ्यांकडून जाणून घेत विविध मार्गदर्शक सूचना करत बंदोबस्त अधिकाधिक चोख केला. रुग्णालयाच्या वाहनतळाच्या आवारातील सर्व गर्दी पोलिसांनी यावेळी हटविली. पोलीस वाहनाच्या ध्वनिक्षेपकावरून सातत्याने नागरिकांना आवाहन केले जात होते. जुने नाशिककडून रुग्णालयाकडे येणारा रस्ता बंद करण्यात आला होता. तसेच मुंबईनाका, नाशिकरोड, पंचवटी या पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी याठिकाणी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले होते. रुग्णालयाच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
--इन्फो--
‘नाकाबंदीचे बॅरिकेड त्वरित हटवा...’
रुग्णांना झाकीर हुसेन रुग्णालयातून अन्यत्र रुग्णवाहिकांमधून स्थलांतरित केले जात होते. तसेच ऑक्सिजनचे सिलिंडर घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयासह अन्य ठिकाणांहून वाहने हुसेन रुग्णालयात येत होती. दरम्यान, शहरात विविध ठिकठिकाणी नाकाबंदीसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेडमुळे या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अडथळा निर्माण होत होता. ही बाब पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ वॉकीटॉकीवरून महत्त्वाचा ‘कॉल’देत सर्वच प्रमुख पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रस्त्यांवरील बॅरिकेड बाजूला हटविण्याच्या सूचना दिल्या.
---
फोटो - २१पीएचएपी११६
===Photopath===
210421\21nsk_23_21042021_13.jpg
===Caption===
पोलीस छावणीचे स्वरुप