चिमणी संवर्धनासाठी निसर्ग सेवकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:37 AM2019-05-15T01:37:48+5:302019-05-15T01:38:02+5:30

सभोवतालच्या पक्ष्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी निसर्ग सेवक युवा मंच या संस्थेने पुढाकार घेतला असून, चिमणी संवर्धनासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्य बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यापासून जलपात्र तयार करून शहर परिसरातील उद्याने, शासकीय कार्यालयांच्या आवारात ते बसविण्याचे अभियान या संस्थेने हाती घेतले आहे.

Nature volunteers initiative for sparrows conservation | चिमणी संवर्धनासाठी निसर्ग सेवकांचा पुढाकार

चिमणी संवर्धनासाठी निसर्ग सेवकांचा पुढाकार

Next
ठळक मुद्देजनजागृतीवर भर : जलपात्र, घरटी वाटपास प्राधान्य; टाकाऊ बाटल्यांचा पुनर्वापर

नाशिक : सभोवतालच्या पक्ष्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी निसर्ग सेवक युवा मंच या संस्थेने पुढाकार घेतला असून, चिमणी संवर्धनासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्य बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यापासून जलपात्र तयार करून शहर परिसरातील उद्याने, शासकीय कार्यालयांच्या आवारात ते बसविण्याचे अभियान या संस्थेने हाती घेतले आहे.
मुलांना निसर्गाची ओळख ज्या पक्ष्यापासून होते तो पक्षी म्हणजे चिऊताई. चिऊताई सीमेंटच्या जंगलात हरविली असून, या चिऊ ताईला आपल्या अंगणात पुन्हा बोलाविण्यासाठी नाशिककरांकडून प्रयत्न सुरू आहेत. विविध संस्था त्यांच्या पातळीवर विविध उपाययोजना करत आहेत. नाशिककरांनीही आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत. असाच काहीसा प्रयत्न नाशिकच्या निसर्ग सेवा युवा मंचने महिनाभरापासून हाती घेतला आहे.
या संस्थेच्या सचिव अनुजा कुलकर्णी, विहार चौधरी, कचरू वैद्य आदी स्वयंसेवक मिळून चिमणी संवर्धनासाठी विविध उपाययोजना राबवित आहेत. या संस्थेने सोशल मीडियाच्या माध्यमातून चिमणी संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या माहितीचा प्रचार-प्रसार सुरू केला आहे.
यासोबत पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानात सुमारे २५ ते ३० जलपात्र बसविले आहेत. तसेच अंबड पोलीस ठाण्याच्या पाठीमागेही जलपात्र, मातीचे वाडगे ठेवले आहेत. येत्या पंधरवड्यात बेळगाव ढगा येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाकडी घरटी बसविण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Nature volunteers initiative for sparrows conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.