विद्या इंटरनॅशनलमध्ये निसर्गचित्र कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:21 PM2019-09-17T23:21:40+5:302019-09-18T00:24:11+5:30
‘‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे’’ निसर्ग राणीच्या या सुंदर कलाकृतीचे वर्णन करण्यापासून लहानगेसुद्धा मागे राहिले नाही. निमित्त होते विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित निसर्ग चित्रकला कार्यशाळेचे.
येवला : ‘‘हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे’’ निसर्ग राणीच्या या सुंदर कलाकृतीचे वर्णन करण्यापासून लहानगेसुद्धा मागे राहिले नाही.
निमित्त होते विद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित निसर्ग चित्रकला कार्यशाळेचे. विद्यार्थी आपल्या चिमुकल्या हातांनी रंगीत कुंचल्याच्या साहाय्याने निसर्गाचे सुंदर चित्र काढण्यात मग्न झाले होते. यावेळी शाळेत जणू रंग, निसर्ग यांची जुगलबंदीच रंगली होती.
शाळेच्या महिन्यांच्या वेगवेगळया थीमनुसार या महिन्याची थीम ‘‘कला’’ असल्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना निसर्गचित्र आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून रेखाटण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून मुलांनीदेखील या कार्यशाळेचा पुरेपूर आनंद घेत निसर्गचित्र रेखाटले व रंगाची मजा घेतली.
मुख्याध्यापक शुभांगी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे महत्त्व सांगितले. यावेळी कलाशिक्षक संतोष बोंबले यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे संस्थापक डॉ. राजेश पटेल यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग हा सर्वात मोठा कलाकार असल्याचे सांगितले.