रोगमुक्तीसाठी निसर्गोपचार पद्धती आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 10:54 PM2022-03-19T22:54:42+5:302022-03-19T23:06:39+5:30
लोहोणेर : मानवाने पंच महाभूतांचे तत्त्व अंगीकारले असता मानवी जीवन सहज सोपे होते. निसर्ग नियमांचे पालन करीत फास्ट फूडचा अवलंब न करता निसर्ग निर्मित पूरक पोषक द्रव्ये सेवन केल्यास त्याचा फायदा शरीरासाठी नक्की होतो. कोणत्याही रोगास प्रतिकारक शक्तीच मारक ठरते. त्यासाठी सात्त्विक व शुद्ध आहार व व्यायामाची जोड महत्वाची आहे, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले.

ठेंगोडा येथे स्वयंभू सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात आयोजित कार्यक्रमात पाण्डेय बोलत होते. पाण्डेय यांनी लोहोणेर व ठेंगोडा गावास सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार दिलीप बोरसे, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त वसंत मोरे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, मविप्र संचालक डॉ. प्रशांत देवरे, सुदर्शन सोनवणे, पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, यशवंत पाटील, दिलीप अहिरे, रामचंद्र जाधव, भुवलसिंग, संजय पांडे, संजय लोखंडे, राहुल देवरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाण्डेय यांनी सांगितले, माणसाला सर्व रोगांपासून पूर्णपणे मुक्ती हवी असेल तर निसर्ग उपचार पद्धती अवलंबून तिच्या सान्निध्यात राहावे लागेल. आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले असून पंचमहाभूतांचे मूळ सिद्धांत यापासून दूर गेल्यामुळे आजाराची लागण होते. जगभरात रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड, संधिवात असे विविध आजार मनाने ग्रासलेल्या लोकांना असून यास बदललेली जीवनशैली कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ.प्रशांत देवरे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन निखिल रोकडे यांनी केले, तर आभार यशवंत पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला राजेंद्र अलई, सतीश देशमुख, नारायण निकम, दिलीप आहिरे, शांताराम वाघ, आनंदा लाडे, दीपक बच्छाव, शरद धनवटे, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा, तुळशीराम शिंदे आदी उपस्थित होते.