नाट्यसेवा थिएटर्स एकांकिका महोत्सव रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:15 AM2021-03-16T04:15:55+5:302021-03-16T04:15:55+5:30

नाशिक : नाट्यसेवा थिएटर्स एकांकिका महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वात तीन एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. वैविध्यपूर्ण विषयांवरील या एकांकिकांनी रसिकांची दाद ...

Natyaseva Theaters Akankika Mahotsav Rangala | नाट्यसेवा थिएटर्स एकांकिका महोत्सव रंगला

नाट्यसेवा थिएटर्स एकांकिका महोत्सव रंगला

Next

नाशिक : नाट्यसेवा थिएटर्स एकांकिका महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वात तीन एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. वैविध्यपूर्ण विषयांवरील या एकांकिकांनी रसिकांची दाद मिळवली.

प्रिया जैन लिखित आणि आनंद-कृतार्थ दिग्दर्शित तो आणि ती नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात आशिष चंद्रचूड, विश्वंभर परेवाल, प्रसाद काळे, प्रतीक विसपुते, तिशा मुनवर आणि निकिता बंदावणे यांच्या भूमिका होत्या. त्याशिवाय भोकरवाडीचा शड्डू ही अजय पाटील लिखित आणि रोहित जाधव दिग्दर्शित एकांकिका सादर करण्यात आली. त्यात बळीराम शिंदे, मयूर परहानकर, चेतन खोकले, अमोल भालेराव, धीरज राजोळे, मनोज शेंद्रे, नितीन पावरा, श्वेता चौरे, मेघाली वैष्णव, सारिका शिंदे, योगेश भोये, भूमिका देसले, साहिल पाटील, हर्षल घुमरे यांनी दमदार भूमिका केल्या. त्याशिवाय बाई जरा कळ काढा या रोहित पगारे लिखित आणि आनंद-कृतार्थ दिग्दर्शित एकांकिका सादर करण्यात आली. त्यात किरण जायभावे, पूजा पूरकर, विश्वंभर परेवाल आणि आरती वाटपाडे यांनी प्रमुख भूमिका निभावल्या.

फोटो (९४)

‘बाई जरा कळ काढा’ एकांकिकेतील एक दृश्य.

Web Title: Natyaseva Theaters Akankika Mahotsav Rangala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.