नवकलाकारांसाठी साधनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:45 AM2017-07-31T00:45:35+5:302017-07-31T00:45:40+5:30

गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आदी कोणतीही कला असो, ती सरावाने बहरते व उत्तरोत्तर विकसित होत असते, त्यामुळे कलाक्षेत्रात येणाºया प्रत्येकाने कलेची आयुष्यभर साधना करण्याची गरज असल्याचा सूर चित्रप्रवास व प्रात्यक्षिक परिसंवादात उमटला.

navakalaakaaraansaathai-saadhanaecai-garaja | नवकलाकारांसाठी साधनेची गरज

नवकलाकारांसाठी साधनेची गरज

Next

नाशिक : गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आदी कोणतीही कला असो, ती सरावाने बहरते व उत्तरोत्तर विकसित होत असते, त्यामुळे कलाक्षेत्रात येणाºया प्रत्येकाने कलेची आयुष्यभर साधना करण्याची गरज असल्याचा सूर चित्रप्रवास व प्रात्यक्षिक परिसंवादात उमटला. के. के. वाघ ललित कला महाविद्यालयातर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती व्याख्यानमालेचे ३२वे पुष्प गुंफताना चित्रकार राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत या सावंत बंधूंनी चित्रकलेचे विविध पैलू उलगडून सांगितले. ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिसंवादात सावंत बंधूंनी त्यांच्या चित्रकलेचा प्रवास उलगडताना शालेय जीवनातील चित्रकलेचा प्रवास तसेच शाळाबाह्य स्पर्धांमधून घेतलेल्या सहभागाच्या आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन परिस्थितीत विविध स्पर्धांमधून सहभाग घेताना ज्येष्ठ चित्रकार व घरातील चित्रकलेला असलेले पोषक वातावरण सदैव प्रोत्साहन देणारे ठरल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. बाळ नगरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. माधुरी गायधनी यांनी केले.
चित्रशिल्प प्रदर्शन
कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मृतीत व्याख्यानमालेदरम्यान, कुसुमाग्रज स्मारक येथे चित्रशिल्प प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार व सावंत बंधूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात विविध चित्रकृती व शिल्पकृती मांडण्यात आल्या असून, हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

Web Title: navakalaakaaraansaathai-saadhanaecai-garaja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.