गाव समिती स्थापून कोरोनाविरूद्ध सरसावले नवीबेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 03:57 PM2020-03-31T15:57:07+5:302020-03-31T15:57:47+5:30
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवीबेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नवीबेज हे राज्यातील पहिलेच गाव मानले जात आहे.
मनोज देवरे
कळवण : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नवीबेज गावकऱ्यांनी कोरोनासाठी लढा देण्यासाठी गावपातळीवर कोरोना प्रतिबंध समिती स्थापन केली आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नवीबेज हे राज्यातील पहिलेच गाव मानले जात आहे.
कोरोना प्रतिबंध समितीने नवीबेज गावकऱ्यांसाठी नियमावली तयार केली आहे. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्धार केला आहे. शिवाय बाहेरगावाहून आलेल्यांना घरातच बसण्याची सूचना करु न संपूर्ण गाव लॉकडाऊन केल्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट आहे. याबाबत काल सोमवारी प्रगतशील शेतकरी घनश्याम पवार यांच्या अध्यक्षतेखाली नवीबेज ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत गाव शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीबेज गावातून पुणे, मुंबई या सारख्या शहरात कामासाठी गेलेले गावकरी गावाकडे येत आहेत. गावात आलेल्या या गावकºयांची नोंद घेण्यात आली असून त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. शिवाय घराबाहेर पडू नका अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. या बैठकीत कोरोना प्रतिबंध समितीच्या अध्यक्षपदी घनश्याम पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सखाराम गोधडे, उपसरपंच तथा मविप्र संचालक अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, व्यावसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत घेतले निर्णय
गावक-यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन नवीबेज कोरोना प्रतिबंध समितीने महत्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यात ग्रामस्थांनी वारंवार हात धुणे, शिंकताना व खोकलताना तोंडाला रु माल, मास्क बांधणे, घरासमोर व दारासमोर साबण व पाण्याची बादली भरु न ठेवणे, बाहेरु न आल्यानंतर घरात जाण्यापूर्वी हात पाय तोंड साबणाने धुणे ,गावात अनावश्यक फिरू नये, गावात घोळका करु न बसू नये, आपापल्या घरात थांबवावे, घराची व परिसराची रोज साफसफाई करावी, सर्दी खोकला ताप आल्यास तात्काळ डॉक्टराना भेटावे, गावात बाहेरु न आलेल्या नागरिकांनी घरात थांबावे व कुटुंबातील व्यक्तीपासून दूर रहावे , भाजीपाला, किराणा, मेडिसन यांची योग्य दराने विक्र ी करतांना ग्राहकांनी वस्तू घेतांना सामाजिक अंतर ठेवावे, नियमांचे पालन केले नाही तर नियुक्त स्वयंसेवक दंडात्मक कारवाई करतील, सार्वजनिक जागेवर व ओट्यावर बसून गप्पा मारणे बंद करावे, गावात अवैध दारु विक्र ी बंद करावी असे निर्बंध लादण्यात आले आहेत. सूचना व नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.