चिंचोलीच्या सरपंचपदी नवनाथ बर्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:24 AM2021-03-04T04:24:38+5:302021-03-04T04:24:38+5:30
चिंचोली ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये युवानेते संजय सानप, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष राजू नवाळे यांच्या पॅनलने बाजी मारली होती. ...
चिंचोली ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये युवानेते संजय सानप, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष राजू नवाळे यांच्या पॅनलने बाजी मारली होती. निवडणूक निर्णय अधिकारी अशोक बिन्नर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी आर. आर. इंगळे यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. विशेष बैठकीस ११ पैकी १० सदस्य उपस्थित होते. सरपंच पदासाठी नवनाथ बर्डे तर उपसरपंच पदासाठी निवृत्ती झाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बिन्नर यांनी नवनाथ बर्डे यांची सरपंच तर निवृत्ती झाडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य छाया दत्तू नवाळे, संजीवनी मनोहर सानप, प्रभाकर किसन लांडगे, धनश्री संदीप झाडे, रीना अशोक गीते, कविता प्रभाकर उगले, महेंद्र अशोक भोळे, सोमनाथ बाबूराव लांडगे उपस्थित होते.
फोटो - ०२ चिंचोली सरपंच
सिन्नर तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नवनाथ शिवाजी बर्डे तर उपसरपंचपदी निवृत्ती झाडे यांची बिनविरोध निवड झाल्यावर सत्कार करताना संजय सानप, राजू नवाळे यांच्यासह कार्यकर्ते.
===Photopath===
020321\02nsk_28_02032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०२ चिंचोली सरपंच सिन्नर तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नवनाथ शिवाजी बर्डे तर उपसरपंचपदी निवृत्ती झाडे यांची बिनविरोध निवड झाल्यावर सत्कार करतांना संजय सानप, राजू नवाळे यांच्यासह कार्यकर्ते.