नवरत्न ग्रुपतर्फे पायी प्रवास करणाऱ्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 09:05 PM2020-05-07T21:05:11+5:302020-05-07T23:49:24+5:30

चांदवड : येथील नवरत्न ग्रुप तर्फे मुंबई आग्रा रोडने सुमारे एक हजार पायी चालणाºया परप्रांतीयांना चांदवड टोल नाका ते राहुड गावापर्यत बिसलरी पाणी बोटल व बिस्किटांची सोय करण्यात आली .

 Navratna Group helps pedestrians | नवरत्न ग्रुपतर्फे पायी प्रवास करणाऱ्यांना मदत

नवरत्न ग्रुपतर्फे पायी प्रवास करणाऱ्यांना मदत

Next

चांदवड : येथील नवरत्न ग्रुप तर्फे मुंबई आग्रा रोडने सुमारे एक हजार पायी चालणाºया परप्रांतीयांना चांदवड टोल नाका ते राहुड गावापर्यत बिसलरी पाणी बोटल व बिस्किटांची सोय करण्यात आली . विशेष म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करुन हे साहित्य वाटप करण्यात आले.की रस्त्याच्या कडेला हे साहित्य मांडून ठेऊन ते पायी व सायकलने प्रवास करणाºया परप्रांतीयांना खरोखरच उपयोगी पडले. तर सामाजिक बांधलकीतून सदर उपक्र म केल्याचे सांगण्यात आले .यावेळी ज्ञानेश्वर भालेराव , दर्शन अजमेरे , किशोर क्षत्रिय ,डॉ .प्रसाद कापडणी,डॉ. सचिन गुजराथी ,ब्रह्मेश कदम ,महेश बोराडे ,संतोष जाधव, प्रकाश सोनवणे ,शहानवाज बागवान , सचिन अग्रवाल आदि उपस्थित होते .औषधे बबलु राऊत, मनोज छाजेड यांनी या लोकांना उपलब्ध करुन दिलीत.नवरत्न ग्रुप तर्फे राबविलेल्या या उपक्र माचे परिसरात स्वागत होत आहे

Web Title:  Navratna Group helps pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक