इगतपुरीच्या पूर्व भागातील महिलांकडून घटस्थापना करत नवरात्रौत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 04:15 PM2020-10-17T16:15:56+5:302020-10-17T16:16:16+5:30
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धार्मिक स्थळे तसेच धार्मिक कार्यक्र मांवर जरी बंदी घालण्यात आली असली तरी इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या ग्रामीण भागामध्ये महिलांनी घट मांडत पूजाविधी करत घटस्थापना उत्साहात केली आहे.
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धार्मिक स्थळे तसेच धार्मिक कार्यक्र मांवर जरी बंदी घालण्यात आली असली तरी इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या ग्रामीण भागामध्ये महिलांनी घट मांडत पूजाविधी करत घटस्थापना उत्साहात केली आहे.
नवरात्रौत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला असून घरोघरी उत्साहात घटस्थापना करण्यात आली. आदिशक्तीच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या इगतपुरी तालुक्यातील नागरिकांनी विविध साहित्याच्या खरेदीसाठी शुक्र वारी (दि.१६) घोटी येथील बाजारपेठेत गर्दी केली होती.
तसेच गोंदे फाटा ते गावापर्यंत असलेल्या रस्त्यावर दुपारपासून तर रात्री ७ वाजेपर्यंत तोंडाला मास्क लावूनच साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थाटण्यात आलेल्या दुकानांमध्ये पूजेचे साहित्य, देवीचे वस्त्र यात प्रामुख्याने घट, देवीच्या घरगुती मूर्ती, नारळ, एकत्रित पूजचे साहित्य, टोपल्यांची अनेक दुकाने थाटण्यात आली होती.
देवीच्या पूजेला लागणारी फळे, नागवेलीची पाने, नारळ, हळद, कुंकू, चमकीच्या कापडाची दुकाने या परिसरात लागली होती. परिसरात देवीच्या मूर्ती खरेदीसाठी तालुक्यातील भक्तांची गर्दी झाली होती. झेंडूची फुले महागली असून दुर्गोत्सवासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दुर्गा मातेला झेंडूच्या फुलांचा हार वाहतात. त्यामुळे अनेकांनी झेंडू फुले विक्र ीची दुकाने लावलेली दिसून येत होती. ४० रूपयांपासून ६० रूपये किलोपर्यंत झेंडूची फुले बाजारात विक्र ीसाठी होती.