शहरात अवतरलेल्या ७५ सायकलस्वार पोस्टमनच्या ‘राईड’ने नाशिककरांचे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 07:18 PM2017-10-28T19:18:07+5:302017-10-28T19:27:21+5:30
नाशिक : टपाल खात्याचे महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावे आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाºया टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खाते व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फे री’चे आयोजन करण्यात आले होेते. अचानकपणे काळाच्या पडद्याआड गेलेला ‘पोस्टमन’ हा घटक इतक्या मोठ्या संख्येने शहरातील रस्त्यांवर अवतरला. ‘दुनिया को लाये और करीब...’ या घोषवाक्याचे सायकलींवर लावलेले फलक, खाकी गणवेश परिधान करून नाशिक मुख्य डाकघर अंतर्गत सेवा देणाºया पोस्टमनपैकी ७५ पोस्टमन सायकल फेरीमध्ये सहभागी झाले होते. आमदार सीमा हिरे, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, प्रवर डाक अधीक्षक पी. जे. काखंडकी, सहायक अधीक्षक पंकज कुलकर्णी वरिष्ठ पोस्टमास्तर मोहन अहिरराव, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आदी मान्यवर उपस्थितीत झेंडा दाखवून ‘पोस्टमन सायकल फेरी’चा शुभारंभ करण्यात आला.
या फेरीमध्ये नाशिक सायकलिस्टचे महिला-पुरुष सायकलपटूंनीही सहभागी होत सायकलस्वार पोस्टमनांचा उत्साह वाढविला. सायकलफेरी मुख्य टपाल कार्यालयापासून सुरू झाली. त्र्यंबकनाका, जुने सीबीएस, शरणपूररोड, कॅनडा कॉर्नर, संत आंद्रिया चर्चमार्गे वनविभागाचे कार्याल, त्र्यंबकरोडने मायको सर्क ल, तिडके कॉलनी, चांडकसर्कलमार्गे गोल्फ क्लब येथे सायकल फेरीचा समारोप करण्यात आला.