नायगाव सरपंचपदी नीलेश कातकाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:51 PM2018-04-06T14:51:23+5:302018-04-06T14:51:23+5:30
नायगाव - येथील सरपंचपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत निलेश तुकाराम कातकाडे यांनी अनिता राजेंद्र काकड यांचा सात विरूद्ध तीन पराभव करून सरपंचपदी विजय मिळवत सत्ता परिवर्तन घडवले आहे.
नायगाव - येथील सरपंचपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत निलेश तुकाराम कातकाडे यांनी अनिता राजेंद्र काकड यांचा सात विरूद्ध तीन पराभव करून सरपंचपदी विजय मिळवत सत्ता परिवर्तन घडवले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी माणिक गाडे यांच्याअध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या मतदान प्रक्रि येत सरपंचपदासाठी निलेश कातकाडे, माजी सरपंच भाऊसाहेब एकनाथ लोहकरे व अनिता राजेंद्र काकड यांनी अर्ज दाखल केले. अर्ज माघारीच्या निर्धारीत वेळेत एकही माघार झाली नाही.त्यामुळे सरपंचपदासाठी तीनही उमेदवार समोरासमोर उभे ठाकल्याने सरपंचपदाची निवड चुरशीची बनली होती. माजी सरपंच इंदुमती मुरलीधर कातकाडे यांनी गुप्त पध्दतीने मतदान घेण्याची विनंती केली.त्यानुसार मतदान घेण्यात आले.उपसरपंच रोशन सुनिल गायकवाड ,आशा रामभाऊ कदम व अनिता सुनिल जेजुरकर हे तीनही सदस्य मतदान प्रक्रि येत सहभागी न झाल्याने गुलाब भांगरे,भिमा जाधव,विष्णू पाबळे,इंदुमती कातकाडे ,अर्चना बुरकुल,सुनिता पिंपळे,मंदाबाई बर्डे दहा सदस्यांनी मतदान केले.दुपारी दोन वाजता झालेल्या मतमोजणीत निलेश कातकाडे यांना ७ ,अनिता काकड यांना ३ तर भाऊसाहेब लोहकरे यांना शुन्य मते मिळाली. त्यानुसार निवडणूक अधिकारी गाडे यांनी नायगावच्या सरपंचपदी निलेश कातकाडे यांचा चार मतांनी विजय झाल्याची घोषणा केली. तलाठी स्वरूप गोराणे व ग्रामसेवक डी.झेड.बन यांनी सहाय्य म्हणून काम पाहिले. नायगावच्या सरपंचपदी निलेश कातकाडे हे विजयी झाल्याचे समजताच कातकाडे समर्थकांनी गुलालाची उधळन करत फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष साजरा केला.यावेळी नविनर्वाचित सरपंच निविनर्वाचित सरपंच कातकाडे यांचा पंचायत समतिी सदस्य संग्राम कातकाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी कुणाल कातकाडे,सुनिल कातकाडे,संदीप जारकड,दत्ता जेजुरकर,लक्ष्मण जेजुरकर,बाबु खालकर,शरद बुरकुल,सुदाम सांगळे,ज्ञानेश्वर कातकाडे,सोमनाथ आव्हाड,देविदास खाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.