निफाडला महाअवयवदान रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:18 AM2017-08-31T01:18:15+5:302017-08-31T01:18:20+5:30
राज्यात महाअवयवदान जनजागृती अभियानांतर्गत महाअवयवदान महोत्सव राबविण्यात येत असून, या अभियानाची जनजागृती करण्यासाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने निफाड शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली.
निफाड : राज्यात महाअवयवदान जनजागृती अभियानांतर्गत महाअवयवदान महोत्सव राबविण्यात येत असून, या अभियानाची जनजागृती करण्यासाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने निफाड शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयापासून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी वैनतेय विद्यालयाचे विद्यार्थी, निफाड उपजिल्ह रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील राठोर, तालुका वैद्यकीय अधिकारी एन. के. चव्हाण, डॉ. रोहण मोरे, डॉ. चंद्रहास पाटील, डॉ. सुनीता ढेपले, डॉ. संकेत अहेर, वैनतेय विद्यालयाचे शिक्षक बाळकृष्ण ठोके, किशोर धामोरे, एन. एस. वाघ, कल्पेश खैरनार आदींसह विद्यार्थी सामील झाले होते. ही रॅली शहराच्या विविध मार्गावरून नेण्यात आली. शिवाजी चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान, अवयवदान जीवनाचे दान अशा घोषणा लिहिलेले फलक झळकत होते. निफाडचे सभापती पंडित अहेर, डॉ. सुनील राठोर ,पोलीस निरीक्षक रणजित डेरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी महाअवयवदान जनजागृती अभियान याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थितांना अवयवदान करण्याबाबत प्रतिज्ञा देण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष मुकुंद होळकर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, नगरसेवक जावेद शेख. एकनाथ तळवाडे, शंकर वाघ, इरफान सय्यद आदी उपस्थित होते . दि. २८ आॅगस्ट रोजी निफाड पंचायत समितीमध्ये आयोजित बैठकीत गटविकास अधिकारी वैशाली रसाळ, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. के. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी , सहाययक, केंद्रप्रमुख आदी कर्मचाºयांना प्रतिज्ञा देऊन अभियानाचे महत्त्व विशद केले.