निकवेल रस्त्यावर उभारले संरक्षक कठडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:57 PM2019-03-28T23:57:29+5:302019-03-28T23:58:39+5:30

निकवेल : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील निकवेल ते डांगसौंदाणे रस्त्यावर कॉँक्र ीटीकरणाचे संरक्षक कठडे उभारण्यात आल्याने परिसरातील वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

Nayekela road safety guard! | निकवेल रस्त्यावर उभारले संरक्षक कठडे!

निकवेल-डांगसौंदाणे रस्त्यावरील वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बसविण्यात आलेले संरक्षक कठडे.

Next
ठळक मुद्देबांधकाम विभागाकडून दखल : परिसरातील वाहनधारकांना दिलासा

निकवेल : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील निकवेल ते डांगसौंदाणे रस्त्यावर कॉँक्र ीटीकरणाचे संरक्षक कठडे उभारण्यात आल्याने परिसरातील वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
‘निकवेल ते डांगसौंदाणे या रस्त्यावरील वळण बनले मृत्यूचा सापळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत संरक्षक कठडे बांधले.
सटाणा ते डांगसौंदाणे रस्त्यावर निकवेल गावालगत येथील पाटस्थळ शेतजमिनीला पाणीपुरवठा करणारा पाटबंधारे विभागाचा पाट गेला आहे. पाच ते सात फूट खोल असलेल्या या पाटचारी वळणावर तीव्र स्वरूपाचे यू टर्न आहेत. या अपघाती वळणावरील पाटचारीजवळ कठडे नसल्याने अनेक वाहनधारकांना याचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. या अपघातात अनेकांना अपंगत्व आले होते. याबाबत येथील नागरिकांनी अनेकवेळा संबंधिताना लेखी सूचना केली होती; पण त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने या तीव्र वळणावर अखेर काँक्रीटीकरणाचे कठडे टाकण्यात आले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून डांगसौंदाणे रस्त्यावरील निकवेल शिवारातून पाटबंधारे विभागाचा पाट गेला असून, वळणावर दोन्ही बाजूस असलेले कठडे पूर्णपणे तुटले होते. या रस्त्यावर या ठिकाणी लहान-मोठे अपघात होत होते. आता कठडे बसविण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.
-विवेक सोनवणे, वाहनधारक, निकवेल

दि. १४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेले वृत्त. (२८ निकवेल १)गेल्या अनेक वर्षांपासून डांगसौंदाणे रस्त्यावरील निकवेल शिवारातून पाटबंधारे विभागाचा पाट गेला असून, वळणावर दोन्ही बाजूस असलेले कठडे पूर्णपणे तुटले होते. या रस्त्यावर या ठिकाणी लहान-मोठे अपघात होत होते. आता कठडे बसविण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.
-विवेक सोनवणे,
वाहनधारक, निकवेल

Web Title: Nayekela road safety guard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.