एनबीटी महाविद्यालयातर्फे ५२ न्यायाधीशांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:50 AM2019-12-29T00:50:50+5:302019-12-29T00:51:26+5:30
न्यायालयातील न्यायाधीशांची जबाबदारी ही अतिशय संयमाने आणि गंभीरतेने हाताळणे गरजेचे असते. न्यायदानात संवेदनशीलतेने विचार करण्यासोबतच अनेक प्रसंगांमध्ये न्यायाधीश म्हणून संयम राखण्याची परीक्षा द्यावी लागत असताना न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाताना न्यायाधीशाच्या भूमिकेत समतोल विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केले.
नाशिक : न्यायालयातील न्यायाधीशांची जबाबदारी ही अतिशय संयमाने आणि गंभीरतेने हाताळणे गरजेचे असते. न्यायदानात संवेदनशीलतेने विचार करण्यासोबतच अनेक प्रसंगांमध्ये न्यायाधीश म्हणून संयम राखण्याची परीक्षा द्यावी लागत असताना न्यायालयीन प्रक्रियांना सामोरे जाताना न्यायाधीशाच्या भूमिकेत समतोल विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त न्यायाधीशांच्या पदापर्यंत पोहोचलेल्या महाविद्यालयातील ५२ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, डॉ. राम कुलकर्णी, आर. पी. देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी कर्णिक यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना बॅक बेंचर म्हणून केलेल्या धमालीचे किस्से सांगितल्याने सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यापासून ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला, तर सध्याच्या काळात सामान्यांच्या जीवनात तणाव वाढत चालला असून, अनेक प्रकरणे न्यायालयांपर्यंत पोहोचता आहेत.
पयार्याने प्रलंबित खटल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशात तडजोडीतून प्रकरणे निकाली
काढत सामंजस्य घडविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला आनंदाची अनुभूती मिळायला हवी, असे मत डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन दीप्ती चव्हाण व
स्नेहा गोडबोले या विद्यार्थिनींनी केले, तर प्रा. हेमा बुरुंग यांनी आभार मानले.
प्रलंबित खटल्याचे प्रमाण वाढले
यावेळी कर्णिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यापासून ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला, तर सध्याच्या काळात सामान्यांच्या जीवनात तणाव वाढत चालला असून, अनेक प्रकरणे न्यायालयांपर्यंत पोहोचता आहेत. पयार्याने प्रलंबित खटल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशात तडजोडीतून प्रकरणे निकाली
काढत सामंजस्य घडविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाला आनंदाची अनुभूती मिळायला हवी, असे मत डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केले.