सटाण्यात विद्युत अभियंत्याला राष्ट्रवादीचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:10+5:302021-09-05T04:18:10+5:30
तालुक्यात बहुतांशी ठिकाणी नियमित विद्युत पुरवठा होत नाही. कमी-उच्च दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे घरगुती, तसेच शेती क्षेत्रातील उपकरण ...
तालुक्यात बहुतांशी ठिकाणी नियमित विद्युत पुरवठा होत नाही. कमी-उच्च दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे घरगुती, तसेच शेती क्षेत्रातील उपकरण मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होत आहेत.
तालुक्यातील जाड-गोळवाड गावातील वस्तीवर अद्याप वीज पोहोचली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणून, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांना यासंदर्भात जाब विचारला असता, महावितरणच्या इतर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची याबाबत कुठलीही मागणी नसल्याचे स्पष्ट केले.
महावितरणचे उत्तर अत्यंत बेजबाबदार असल्याचा आरोप सोनवणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, फाईम शेख, राविकाँ तालुकाध्यक्ष सुयोग आहिरे, रायुकाँ शहराध्यक्ष सुमित वाघ, यशवंत कात्रे, संदीप सोनवणे, सुनील सोनवणे, बबू सोनवणे, रवी शिंदे, पोपट सोनवणे, शिवाजी रौदळ, संदीप भामरे आदींसह उपस्थित पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केला.
इन्फ
सक्तीची वसुली थांबवा
अंधार दूर करण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीपेक्षा महावितरणतर्फे स्वतःहून कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करीत, आंदोलकांनी सक्तीची वीज बिल वसुली अन्यायकारक असून, वायरमन व ठेकेदार मनमानी करून मोठ्या थकबाकीदारांना झुकते माप देत असल्याचा आरोप केला.
तालुक्यातील भाक्षी-मुळाणेसह शहरालगत असलेल्या परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी वर्गणीद्वारे निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन उपस्थितांनी दिले; परंतु महावितरणतर्फे तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली.
फोटो- ०४ सटाणा अभियंता
सटाणा येथे राष्ट्रवादीच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले.
040921\04nsk_25_04092021_13.jpg
फोटो- ०४ सटाणा अभियंता