राष्ट्रवादी-भाजपाचा विषय समित्यांवर कब्जा
By admin | Published: April 6, 2017 02:27 AM2017-04-06T02:27:18+5:302017-04-06T02:27:34+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन तासांच्या अभूतपूर्व गोंधळानंतर राष्ट्रवादी व भाजपाने चार समित्यांवर कब्जा मिळविला
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन तासांच्या अभूतपूर्व गोंधळानंतर राष्ट्रवादी व भाजपाने चार समित्यांवर कब्जा मिळविला. शिवसेना व कॉँग्रेसने सभात्याग केल्याने ३९ विरुद्ध ० मतांनी भाजपा-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यात समाजकल्याण समिती सभापतिपदी कॉँग्रेसच्या बंडखोर सदस्य सुनीता रामदास चारोस्कर यांची निवड करण्यात आली, तर राष्ट्रवादीकडून महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी अपर्णा वामन खोसकर व विषय समिती सभापतिपदी यतीन पगार यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या कोट्यातून मनीषा रत्नाकर पवार यांची विषय समिती सभापतिपदी निवड करण्यात आली.
शिवसेना-कॉँग्रेसच्या सदस्यांनी कॉँग्रेसच्या बंडखोर सदस्यांना व्हीप बजावण्याच्या कारणावरून सभागृहात दोन तास गोेंधळ घातला. कॉँग्रेसच्या महिला सदस्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. पीठासीन अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दोन तास संयमी भूमिका घेत दुपारी साडेचार वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले. भाजपा व राष्ट्रवादीकडून सदस्य सिद्धार्थ वनारसे व डॉ. प्रदीप गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज नेले. तर शिवसेना-कॉँग्रेसकडून बाळासाहेब क्षीरसागर, भास्कर गावित, दीपक शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज नेले. दुपारी एक वाजता सभागृहात भाजपा-राष्ट्रवादीचे ३५ सदस्य तसेच कॉँग्रेसचे बंडखोर सुनीता चारोस्कर, अशोक टोेंगारे, शोभा कडाळे यांच्यासह अपक्ष रूपांजली माळेकर असे ३९ सदस्य एका बाजूला बसले. महिला व बालकल्याण समितीसाठी भाजपा-राष्ट्रवादीकडून अर्पणा खोसकर तर शिवसेना-कॉँग्रेसकडून अश्विनीकुमार अहेर यांनी उमेदवारी अर्ज भरले. समाजकल्याण समितीसाठी कॉँग्रेस बंडखोर सुनीता रामदास चारोस्कर यांनी, तर शिवसेना-कॉँग्रेसकडून माकपा बंडखोर अनिता गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज भरले. अन्य दोन विषय समिती सभापतिपदासाठी आघाडीकडून मनीषा रत्नाकर पवार व यतीन पगार यांनी, तर युतीकडून शंकर धनवटे व धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज भरले. अर्ज माघारीच्या मुदतीत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने पीठासीन अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर उपाध्यक्ष नयना गावित व गटनेते यशवंत गवळी यांनी कॉँग्रेसच्या बंडखोरांना पक्षाची व्हीप बजावण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजपा-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी व्हीप बजावण्याचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर गोंधळास सुरुवात झाली. दोन तासांच्या गोंधळानंतर सेना-कॉँगे्रसच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे भाजपा-राष्ट्रवादी व कॉँग्रेस बंडखोर उमेदवारांचा विजय निश्चित झाला. (प्रतिनिधी)
शिवसेना-कॉँग्रेसच्या सदस्यांनी कॉँग्रेसच्या बंडखोर सदस्यांना व्हीप बजावण्याच्या कारणावरून सभागृहात दोन तास गोेंधळ घातला. कॉँग्रेसच्या महिला सदस्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. पीठासीन अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दोन तास संयमी भूमिका घेत दुपारी साडेचार वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले. भाजपा व राष्ट्रवादीकडून सदस्य सिद्धार्थ वनारसे व डॉ. प्रदीप गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज नेले. तर शिवसेना-कॉँग्रेसकडून बाळासाहेब क्षीरसागर, भास्कर गावित, दीपक शिरसाट यांनी उमेदवारी अर्ज नेले. दुपारी १ वाजता सभागृहात भाजपा-राष्ट्रवादीचे ३५ सदस्य तसेच कॉँग्रेसचे बंडखोर सुनीता चारोस्कर, अशोक टोेंगारे, शोभा कडाळे यांच्यासह अपक्ष रूपांजली माळेकर असे ३९ सदस्य एका बाजूला बसले. महिला व बालकल्याण समितीसाठी भाजपा-राष्ट्रवादीकडून अर्पणा खोसकर तर शिवसेना-कॉँग्रेसकडून अश्विनीकुमार अहेर यांनी उमेदवारी अर्ज भरले.
समाजकल्याण समितीसाठी कॉँग्रेस बंडखोर सुनीता रामदास चारोस्कर यांनी, तर शिवसेना-कॉँग्रेसकडून माकपा बंडखोर अनिता गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज भरले. अन्य दोन विषय समिती सभापतिपदासाठी आघाडीकडून मनीषा रत्नाकर पवार व यतीन पगार यांनी, तर युतीकडून शंकर धनवटे व धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज भरले.
अर्ज माघारीच्या मुदतीत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने पीठासीन अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर उपाध्यक्ष नयना गावित व गटनेते यशवंत गवळी यांनी कॉँग्रेसच्या बंडखोरांना पक्षाची व्हीप बजावण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजपा-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी व्हीप बजावण्याचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर गोंधळास सुरुवात झाली. दोन तासांच्या गोंधळानंतर सेना-कॉँगे्रसच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे भाजपा-राष्ट्रवादी व कॉँग्रेस बंडखोर उमेदवारांचा विजय निश्चित झाला. (प्रतिनिधी)