Maharashtra Political Crisis: “संजय राऊतांवर कारवाई अपेक्षित होतीच, एकदा तपास सुरु झाला की...”; छगन भुजबळांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 12:31 PM2022-07-31T12:31:57+5:302022-07-31T12:32:46+5:30

Maharashtra Political Crisis: भुजबळ फार्मवर पण किती वेळा धाडी पडतात, मोजता येत नव्हत्या एवढ्या पडल्या, असे छगन भुजबळ म्हणाले.

ncp chhagan bhujbal reaction on ed action on shiv sena sanjay raut and said that it was expected | Maharashtra Political Crisis: “संजय राऊतांवर कारवाई अपेक्षित होतीच, एकदा तपास सुरु झाला की...”; छगन भुजबळांचे सूचक विधान

Maharashtra Political Crisis: “संजय राऊतांवर कारवाई अपेक्षित होतीच, एकदा तपास सुरु झाला की...”; छगन भुजबळांचे सूचक विधान

Next

नाशिक: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम सकाळीच संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. शोधमोहिम आणि चौकशी सुरू असून, संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावर प्रतिक्रिया देताना, संजय राऊत यांच्यावर ही कारवाई अपेक्षित होती, असे म्हटले आहे. 

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, संजय राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होतीच. एकदा ईडीचा तपास सुरु झाला की, त्यांचे ऑफिस, घर चेक करतात. ईथे भुजबळ फार्मवर पण किती वेळा धाडी पडतात, मोजता येत नव्हत्या एवढ्या पडल्या, तपासाचा तो भाग असल्याचा टोला लगावत संजय राऊत यांना अटक होईल का त्याबाबत बोलू शकणार नाही, असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. 

खऱ्या खोट्या गोष्टींना उत येत असतो 

अलीकडेच संजय राऊत यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, ते या क्लिपमध्ये एका महिलेशी असभ्य भाषेत संवाद साधत शिवीगाळ करताना ऐकू येत आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला असता, संजय राऊतांच्या ऑडिओ क्लिप बाबत माहिती नाही, पोलिस चौकशी करतील, खऱ्या खोट्या गोष्टींना उत येत असतो, असे सांगत छगन भुजबळ यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले. तसेच अर्जुन खोतकरांचे वक्तव्य ऐकले तर ते बोललेच की मी आणि कुटुंब अडचणीत आल्याने शिंदे गटात जातो आहे, आतापर्यंत आपण म्हणत होतो पण आता तिकडे जाणारेही सांगतायत अजून काय बोलायचे? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांवरील ईडी कारवाईवरून भाजपवर निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये, राज्यपालाच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाची ही नवी खेळी. आज ईडीचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला, अशी घणाघाती टीका केली आहे. 
 

Web Title: ncp chhagan bhujbal reaction on ed action on shiv sena sanjay raut and said that it was expected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.