राष्ट्रवादीचा शहरात २१०० वृक्षारोपणाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:37+5:302021-06-10T04:11:37+5:30

सध्याच्या कोरोनाविरोधातील लढाईच्या काळात सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व अधिक लक्षात आले असून, हवेतील प्राणवायूचे अर्थात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी पर्यावरण रक्षण ...

NCP decides to plant 2100 trees in the city | राष्ट्रवादीचा शहरात २१०० वृक्षारोपणाचा संकल्प

राष्ट्रवादीचा शहरात २१०० वृक्षारोपणाचा संकल्प

Next

सध्याच्या कोरोनाविरोधातील लढाईच्या काळात सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व अधिक लक्षात आले असून, हवेतील प्राणवायूचे अर्थात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी पर्यावरण रक्षण व संवर्धनाची गरज सर्वांना समजली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादीतील सर्व फ्रंटल व सेलमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून नाशिक शहरात येत्या १५ दिवसांत २१०० वृक्षारोपण करणार असून, वृक्षसंवर्धनाची जबाबदारी संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते घेणार आहेत. गेल्या दशकापासून वाढती लोकसंख्या, वाढते नागरीकरण यामुळे नाशिकमधील विविध प्रदूषणात वाढ झाली असून, नाशिकमधील झाडांची कत्तल सुरू झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करता हवेतील नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याकरिता नाशिक पुन्हा हिरवेगार करण्याचा संकल्प शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केला आहे. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, शहर सरचिटणीस संजय खैरनार, अंबादास खैरे, धनंजय निकाळे, डॉ. अमोल वाजे, जगदीश पवार, हरीश भडांगे, शंकरराव पिंगळे, बाळासाहेब जाधव, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गीते, मनोहर कोरडे आदी उपस्थित होते. (फोटो ०७ एनसीपी)

Web Title: NCP decides to plant 2100 trees in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.