राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सोनवणे यांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 07:12 PM2019-07-03T19:12:40+5:302019-07-03T19:14:13+5:30
येवला : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस पदाचा येथील भागवत सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. त्या सोबत राष्ट्रवादीच्या प्राथमिक तसेच सक्रि य सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. हा राजीनामा सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्याकडे सुपूर्द केला असून याची प्रत आमदार छगन भुजबळ यांना पाठवली आहे.

येवला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सन २०१४ पासून ते सक्र ीय होते. तालुक्यातील सर्व प्रलंबित सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी मदत करु अशी भुमिका तत्कालीन पालकमंत्री भुजबळ यांनी घेतल्याने ममदापूर येथील साठवण बंधाऱ्याच्या भुमिपूजन प्रसंगी सोनवणे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भुमिपूजनानंतर ५ वर्ष लोटली तरी ममदापूर येथील साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागला नाही. सोनवणे यांनी पाठपुरावा करु न तालुक्यातील अनेक सिंचन प्रकल्पांचे सर्वेक्षण, अन्वेन्शन, सविस्तर प्रकल्प अहवाल, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आदींचा पाठपुरावा करु न प्रकल्प मार्गी लावले होते. राष्ट्रवादीची राज्यात पुन्हा सत्ता येईल आणि भुजबळांच्या मदतीने तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रश्न सोडवता येईल अशी सोनवणे यांना आशा होती. मात्र २०१४ ला राष्ट्रवादीची सत्ता गेली. हेवीवेट नेते असूनही त्यानंतर सिंचन प्रश्न जैसे थे राहिले. सध्याच्या भाजपा-शिवसेना युती सरकारनेही भुजबळांच्या मतदार संघात असहकाराची भुमिका ठेवली. यामुळे देवदरी येथील देवनाचा सिंचन प्रकल्प रखडला. येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागाला अपेक्षा असलेल्या पुणेगाव-डोंगरगाव कालव्यालाही पाणी आले नाही. जनतेला विविध निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करता आली नाही. याची खंत म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचे सोनवणे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.