राष्ट्रवादीकडून ३१ प्रभागांसाठी ५२८ उमेदवार इच्छुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:18 AM2021-09-15T04:18:45+5:302021-09-15T04:18:45+5:30
या संदर्भात राष्ट्रवादी भवन येथे पक्षाची बैठक होऊन त्यात निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी बोलताना माजी ...
या संदर्भात राष्ट्रवादी भवन येथे पक्षाची बैठक होऊन त्यात निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी बोलताना माजी आमदार जयंत जाधव यांनी, महापालिका निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बूथ रचनेवर जास्तीत जास्त भर द्यावा. गेल्या निवडणुकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. परंतु आता सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून राज्यासह नाशिकची राजकीय परिस्थिती वेगळी झाल्याने त्याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीमध्ये होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असून नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु कालावधी कमी राहिल्याने तयारीचा वेग वाढवावा लागणार असल्याचे सांगितले. तर शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी, इच्छुकांनी रिव्हर्स कॅलेंडर बनवून मतदार याद्यांचे वाचन सुरू करावे. तसेच दुबार नावे वगळून नवीन मतदार नोंदणी केली पाहिजे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी वाॅर्ड रचना, मतदार यादीचे अपडेशन या सर्व प्रक्रिया इच्छुकांनी राबविल्या पाहिजेत. उमेदवारी कोणाला मिळेल याची आज शाश्वती देता येत नाही. पक्ष स्वतःहून उमेदवारी देईल असे सांगून अनेक इच्छुकांनी फोनद्वारे संपर्क साधला आहे. त्यांचीही चाचपणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, निवृत्ती अरिंगळे, गटनेते गजानन शेलार, मधुकर मौले, संजय खैरनार, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, मनोहर बोराडे, अनिता भामरे, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, दत्ता पाटील, बाळासाहेब जाधव, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गीते, सुरेखा निमसे, जीवन रायते, मकरंद सोमवंशी, मनोहर कोरडे, मुजाहिद शेख, शंकर मोकळ, कुणाल बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.