नाशकात राष्ट्रवादी महिलांचा ‘कॅन्डल’ मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 02:53 PM2018-04-16T14:53:24+5:302018-04-16T14:53:24+5:30

जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय आसिफा नावाच्या मुलीवरील पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून

NCP women's canal march in Nashik | नाशकात राष्ट्रवादी महिलांचा ‘कॅन्डल’ मार्च

नाशकात राष्ट्रवादी महिलांचा ‘कॅन्डल’ मार्च

Next
ठळक मुद्देमागणी : बलात्काऱ्यांना फाशी द्याभाजपाच्या राज्यात महिला व बालिकांची सुरक्षितता धोक्यात

नाशिक : शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जम्मू-काश्मीरातील कथुआ येथील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशी द्यावी, मागणी या मागणीसाठी सिडकोत महिलांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.
जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील आठ वर्षीय आसिफा नावाच्या मुलीवरील पाशवी बलात्कार व हत्या तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार अशा दोन्ही प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून, भाजपाच्या राज्यात महिला व बालिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, अशी मागणी करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली सिडको, राणा प्रताप चौक येथे महिलांच्या वतीने कॅन्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. कॅन्डल मोर्चात सहभागी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, हिना शेख, पुष्पा राठोड, रजनी चौरसिया, संगीता चौधरी, सुजाता कोल्हे, मंगला मोरे, संगीता अहिरे, निता वडनेरे, संगीता सानप, विजया जाधव, प्रमिला पाटील, रंजना वाघ, शमा शेख, आशा ठाकरे, पूजा चौधरी, मंगल बागुल, आरती चौधरी, मीना चित्ते, अंजली निकम, प्रिया कापुरे, पुष्पा निकम, सविता कासार, प्रयाग कापुरे, नेहा नहिरे, कल्याणी जाधव, वैशाली तायडे यांसह आदी महिला उपस्थित होत्या.


 

 

Web Title: NCP women's canal march in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.