इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

By श्याम बागुल | Published: August 28, 2018 06:41 PM2018-08-28T18:41:30+5:302018-08-28T18:42:56+5:30

NCP's agitation against the fuel price hike | इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

Next
ठळक मुद्देपेट्रोलपंपावर गांधीगिरी : गुलाबपुष्पाचे वाटप ‘एकही भूल कमल का फूल’, ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’

नाशिक : ‘एकही भूल कमल का फूल’, ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन भाजपा-शिवसेना युती सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील त्र्यंबकनाका येथील पेट्रोलपंपावर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इंधन दरवाढ होत असून, मंगळवारी पुन्हा त्यात वाढ झाल्याच्या निषेधार्थ दुपारी साडेतीन वाजता राष्टÑवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्र्यंबकनाका येथील पेट्रोलपंपावर एक येत सरकारच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली तसेच इंधन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना गांधीगिरीने फुलांचे वाटप करण्यात आले. तसेच ‘एकही भूल कमल का फूल’ असे आवर्जुन सांगण्यात आले. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची धावपळ उडाली. इंधन दरवाढीने आणखी महागाईचा भडका उडण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ. भारती पवार, बाळासाहेब कर्डक, डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत ढिकले, कविता कर्डक, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्ष अनिता भामरे, विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, सुरेश आव्हाड, सोमनाथ बोराडे, संजय खैरणार, बाळासाहेब म्हस्के, मकरंद सोमवंशी, सुनील कोथमिरे, लक्ष्मण मंडाले, शंकर मोकळ आदी उपस्थित होते.

Web Title: NCP's agitation against the fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.