मोदींचे भाषण प्रक्षेपित करून राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:11 AM2021-07-03T04:11:11+5:302021-07-03T04:11:11+5:30

'बहुत हुई महंगाई की मार अब बस कर यार' असे सर्वसामान्य जनता बोलू लागली आहे. केंद्र सरकारने अचानक सिलिंडरचे ...

NCP's agitation by broadcasting Modi's speech | मोदींचे भाषण प्रक्षेपित करून राष्ट्रवादीचे आंदोलन

मोदींचे भाषण प्रक्षेपित करून राष्ट्रवादीचे आंदोलन

Next

'बहुत हुई महंगाई की मार अब बस कर यार' असे सर्वसामान्य जनता बोलू लागली आहे. केंद्र सरकारने अचानक सिलिंडरचे दर २५.५० रुपयांनी वाढविले असून, दीड वर्षापासून सबसिडी केंद्र सरकारने बंद केली आहे. इंधन व गॅस सिलिंडरच्या किमतीतून मोठा हिस्सा केंद्र सरकारच्या तिजोरीत जात असून याची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसत असल्याने त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. त्यात कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अनेकांना जगणे मुश्कील झाले असून इंधनाच्या वाढत्या किमतींनी जनता हैराण झाली आहे. अशा जीवघेण्या परिस्थितीत केंद्र सरकार दिवसेंदिवस इंधनासह गॅस सिलिंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. महागाईमुळे अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे म्हटले आहे.

या आंदेालनात माजी खासदार देवीदास पिंगळे, नानासाहेब महाले, दिलीप खैरे, अशोक सावंत, गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, हरीश भडांगे, जगदीश पवार, अनिता भामरे, अंबादास खैरे, संजय खैरनार, गौरव गोवर्धने, धनंजय निकाळे, सलीम शेख, सोनिया होळकर, डॉ. अमोल वाजे, धनंजय रहाणे, महेश भामरे, किशोर शिरसाठ, मनोहर कोरडे, जीवन रायते, समाधान तिवडे, सचिन कलासरे, मुन्ना अन्सारी, मन्ना जाधव, पूजा आहेर, नाना पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(फोटो ०२ एनसीपी)

Web Title: NCP's agitation by broadcasting Modi's speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.