कॉँग्रेसविरूद्ध राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

By admin | Published: February 16, 2017 11:14 PM2017-02-16T23:14:01+5:302017-02-16T23:14:15+5:30

सत्तासंघर्ष : भाजपाची खाते उघडण्यासाठी कसोटी पणाला

NCP's biting clash against Congress | कॉँग्रेसविरूद्ध राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

कॉँग्रेसविरूद्ध राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

Next

वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर
तालुक्यातील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या हरसूल गटात राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत अपक्ष रूपांजली माळेकर आणि कॉँग्रेसचे देविदास जाधव यांच्यात अटीतटीचा सामना रंगणार आहे.
हरसूल गट आतापर्यंत सन २००२ च्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर सातत्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. यावेळेस गटातील उमेदवार इंजि. विनायक माळेकर यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेसचे उमेदवार देवीदास जाधव यांनी हरकत घेतल्याने बाद ठरविण्यात अला. पण सुदैवाने माळेकर यांच्या पत्नी रुपांजली माळेकर यांची याच गटात अपक्ष उमेदवारी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनाच पुरस्कृत करून गटातील लढत प्रतिष्ठेच्या मुद्द्यावर जाहीर केली आहे.
या गटात चौरंगी लढत होत असून, काँग्रेसचे जुने जाणते कार्यकर्ते देवीदास जाधव हे वीरनगर खरवळचे रहिवासी एक अभ्यासू नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रूपांजली माळेकर यांच्याबरोबर हरसूलच्याच शेंडेपाडा येथील राहणारे पण नोकरी पूर्वी ते सिन्नर येथे होते. भाजपाकडून उच्चशिक्षित प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख हरसूल गटात रिंगणात उतरले आहे आणि ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. आतापर्यंतच्या तीन पंचवार्षिकमध्ये भाजपाला साधे खाते उघडता आले नाही. यावरून भाजपा-सेनेची परिस्थिती आतापर्यंत कशी होती याची कल्पना येते. हरसूल गटात यावेळेस अनु. जमाती राखीव असून, यातील शिवसेना उमेदवार पांडुरंग तुकाराम खाडे हे कश्यपनगर, धोंडेगाव येथील रहिवासी असले तरी सध्या ते त्र्यंबकेश्वर येथेच वास्तव्यास आहेत. ते पूर्वी वनविभागात नोकरीला होते श्रीमती माळेकर यासारस्ते येथील रहिवासी असून उच्चशिक्षित आहेत. विशेष म्हणजे सासरकडून राजकारणाची पार्श्वभूमी आहे. त्याचा त्यांना फायदा होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.४हरसूल गटात ४० गावे आहेत व २९ ग्रामपंचायती आहेत. या गटाची लोकसंख्या ४९,८८१ अशी असून, या गटात ३०,७९८ मतदार आहेत. यामध्ये १६,०८९ पुरुष व १४,७०९ स्त्री मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या गटात तिरंगी लढत अपेक्षित आहे. आतापर्यंत खाते न उघडलेल्या भाजपाला यश मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सेवानिवृत्ती होईपर्यंत याच भागात सेवा केलेले पांडुरंग खाडे यांच्या सेवेची पावती मतदार शिवसेनेच्या माध्यमातून देतील काय? तर काँगे्रेसच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा उचललेल्या देवीदास जाधव यांना सेवेचा उपयोग होणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या गटात प्रचाराचा मुद्दा विकासाचा व पारदर्शी कारभाराचा असला तरीदेखील देविदाव जाधव व रुपांजली माळेकर यांच्यात बिग फाइट होणार आहे.

Web Title: NCP's biting clash against Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.