महागाईविरोधात सटाण्यात राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:11 AM2021-07-10T04:11:50+5:302021-07-10T04:11:50+5:30
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज ...
आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बैलगाडी मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील व पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, केशव मांडवडे, संजय चव्हाण,यशवंत शिरसाठ, ओबीसी सेलचे समाधान जेजुरकर, डॉ.योगेश गोसावी, विजय पवार, महिला तालुकाध्यक्षा ॲड.रेखा शिंदे, युवक तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, शहराध्यक्ष सुमित वाघ, अमोल बच्छाव, नगरसेविका सुरेखा बच्छाव, उषा भामरे, पंचायत समितीचे सदस्य वसंत पवार आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
इन्फो
केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून ‘एकही भूल कमल का फूल'’ ‘गांधी लढे ते गोरोंसे, हम लढेंगे चोरोंसे...' अशी विविध घोषणाबाजी करीत पक्षाचे शेकडो कार्यकर्ते बैलगाडी मोर्चात सहभागी झाले होते. तहसील आवारात मोर्चा येताच सभेत रूपांतर झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष पगार यांनी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने इंधनाचे दर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
फोटो - ०९ सटाणा राष्ट्रवादी
वाढत्या महागाईच्या निषेधार्थ सटाणा शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेला बैलगाडी मोर्चा.
090721\09nsk_29_09072021_13.jpg
फोटो - ०९ सटाणा राष्ट्रवादी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ सटाणा शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेला बैलगाडी मोर्चा.