इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे लॉलिपॉप वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:05+5:302021-03-07T04:14:05+5:30
पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाक गॅसच्या किमती गगनाला भिडत असून, सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे मुश्किल झाले आहे. अत्यावश्यक असणाऱ्या किराणा, तेल, ...
पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाक गॅसच्या किमती गगनाला भिडत असून, सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे मुश्किल झाले आहे. अत्यावश्यक असणाऱ्या किराणा, तेल, दूध व भाजीपालाच्या किमती इंधनदर वाढीमुळे दिवसेंदिवस वाढत असून, या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य माणूस इंधन दरवाढीच्या धास्तीमुळे घराबाहेर वाहन काढताना विचार करू लागला आहे. केंद्र सरकारने रॉकेल बंदी तसेच वायू प्रदूषणाच्या नावाखाली चुलीवरही बंदी लावल्याने गरीब व मध्यमवर्गीय जनतेला गॅस सिलिंडरशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यात प्रत्येक वेळी गॅस सिलिंडरची दरवाढ होत असल्याने जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. या केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निषेध व्यक्त करीत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणारी नागरिकांना चॉकलेट आणि लॉलीपॉपचे वाटप करून मोदी सरकारच्या खिल्ली उडविली. यावेळी माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, सातपूरचे अध्यक्ष जीवन रायते यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब जाधव, मधुकर मौले, बाळा निगळ, नीलेश भंदुरे, अनिस शेख, सिद्धांत काळे, प्रवीण नागरे, समाधान तिवडे, संदीप पवार, प्रदीप मुंढे, सचिन उशीर, पंकज भामरे, गणेश नवले, महेश जाधव, तुषार दिवे, संतोष बल्लाळ, महेश आहेर, दत्ताजी वामन, विश्वनाथ निकम, किरण शिंदे, प्रशांत गांगुर्डे, राकेश गांगुर्डे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(फोटो ०६ एनसीपी) राष्ट्रवादीच्या वतीने लॉलिपॉप वाटप आंदोलनात सहभागी झालेले डॉ.अपूर्व हिरे, नानासाहेब महाले, जीवन रायते, बाळासाहेब जाधव, मधुकर मौले, बाळा निगळ, नीलेश भंदुरे, अनिस शेख आदी.