पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा : दुचाकी ढकलून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 08:09 PM2017-09-16T20:09:26+5:302017-09-16T20:13:04+5:30
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.१६) दुचाकी ढकलत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले
नाशिक : पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि.१६) दुचाकी ढकलत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. वाढते पेट्रोल व डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असल्याचे सांगत राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर या दरवाढीचा निषेध मोर्चा काढला
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. ‘मोदी तेरा अच्छा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. बंद दुचाकी वाहने ढकलत आणत ती परवडत नसल्याचे दाखवत, सरकारने केलेल्या दरवाढीचा निषेध करण्यात आला. राष्टÑवादीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रुड आॅइलचे दर घसरले असतानाही देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांक गाठत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने नक्की कोणाला सुखाचे दिवस येणार आहेत हे सरकारने जनतेला सांगावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बलकवडे यांनी यावेळी केले. राज्यात दुष्काळ जाहीर न करता, पेट्रोल-डिझेलवर दुष्काळ कर कशासाठी घेतला जातोय आणि ज्या शेतकºयांच्या नावाखाली ही लूट सरकारने चालवली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. केंद्राने ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी करत आंदोलनाचा इशाराही दिला.