राष्ट्रवादी काँग्रेसचा हेल्मेट सक्तीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 09:54 PM2019-02-06T21:54:47+5:302019-02-06T21:56:31+5:30
इगतपुरी : शहरीभागासह ग्रामीण भागात देखील पोलीस प्रशासनाने हेल्मेटसक्ती सुरू केली आहे. या हेल्मेटसक्तीला इगतपुरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शविला असून, या विषयी इगतपुरी पोलिसांना मंगळवारी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.

इगतपुरी शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती असून, सर्व सरकारी कार्यालये या ठिकाणी आहेत. शहरात किरकोळ कामांसाठी फिरताना देखील हेल्मेट वापर सक्तीमुळे दुचाकी स्वरांना त्रास सहन करावा लागत आहे. जवळच्या अंतरासाठी सतत हेल्मेट परिधान करणे संयुक्तिक नसल्यामुळे , ही सक्ती शहरात न करता शहराबाहेर, महामार्गावर करण्यात यावी असे निवेदनात स्पष्ट केले आहे. इगतपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांना निवेदन सादर करून, चर्चा करण्यात आली.
यावेळी नाशिक उपजिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, शहराध्यक्ष वसीम सय्यद, शहर उपाध्यक्ष अनंत देहाडे, महेश शिरोळे, मिलिंद हिरे, मन्सूर खान, अल्पसंख्याक शहराध्यक्ष मुजाहिद शेख, रवी जगताप, निजाम खान, इरफान सय्यद, राहुल दोंदे, नाजीम मोमीन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.