शहर बससेवेच्या वादात राष्ट्रवादीची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:49 AM2017-08-29T01:49:04+5:302017-08-29T01:49:10+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे बससेवेच्या फेºया पूर्ववत करा अथवा महापालिकेकडे बससेवा वर्ग करा, अशी मागणी राष्टÑवादीचे आमदार जयवंतराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून परिवहन महामंडळ आणि महापालिका यांच्यात संघर्ष सुरू असून, आजवर महासभेने सदरचे प्रस्ताव ठोकरून लावले असताना आता राष्टÑवादीने बससेवा मनपाकडे वर्ग करण्याची भूमिका घेतल्याने या वादाला राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. त्यामुळे बससेवेच्या फेºया पूर्ववत करा अथवा महापालिकेकडे बससेवा वर्ग करा, अशी मागणी राष्टÑवादीचे आमदार जयवंतराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून परिवहन महामंडळ आणि महापालिका यांच्यात संघर्ष सुरू असून, आजवर महासभेने सदरचे प्रस्ताव ठोकरून लावले असताना आता राष्टÑवादीने बससेवा मनपाकडे वर्ग करण्याची भूमिका घेतल्याने या वादाला राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जाधव यांनी म्हटले आहे, शहर बससेवा नाशिक महानगरपालिकेकडे वर्ग करण्याच्या मुद्यावर पालिका आयुक्त आणि राज्य परिवहन महामंडळातील अधिकाºयांतील सुप्त संघर्षामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले जात आहेत. शहर बससेवेच्या आजवर दररोज १९० ड्युटी असत. त्यापैकी सध्या ७० ड्युटी बंद झालेल्या आहेत. म्हणजेच एका ड्युटीच्या आठ फेºयांप्रमाणे एकूण ५६० बसफेºया बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना बसथांब्यावर तासन्तास बससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या सुरू असलेल्या बसेसलाही तुफान गर्दी होत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर एस. टी. महामंडळाने नाशिक शहरातील बसफेºया कमी केल्यामुळे नादुरु स्त बसेसची संख्या वाढल्याने काम नसलेल्या ५० चालक व ५० वाहकांकडून सक्तीने रजेचे अर्ज भरून घेतले. त्यामुळे दि. २२ आॅगस्ट रोजी एस.टी. कर्मचाºयांनी अचानक आंदोलन करून शहर बससेवा बंद ठेवली होती. परिवहन महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेसाठी असल्यामुळे नफ्याबाबत विचार न करता प्रवाशांच्या सेवेला अग्रक्र म देऊन शहर बससेवेच्या फेºया पूर्ववत सुरू करण्यात याव्यात. तसेच शहरातील प्रवासी वेठीस धरले जात असल्यामुळे शहर बससेवा सुरळीत होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सदर सेवा महानगरपालिकेकडे वर्ग करावी किंवा फेºया पूर्ववत सुरू करण्याबाबत आपण स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शहर बससेवा मनपाने ताब्यात घेण्याबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
व्यवहार्यता तपासूनच निर्णय घेणार
शहर बससेवा ताब्यात घेणे असो अथवा बीआरटीस प्रकल्प याबाबत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबत व्यवहार्यता तपासून पाहूनच उचित निर्णय घेतला जाईल. महापालिकेने बससेवा चालवावी की नाही, हे पूर्णपणे महापालिकेवर निर्भर आहे. बससेवा चालविणे बंधनकारक नाही. ते ऐच्छिक आहे. बससेवा चालविण्याबाबतचे वेगवेगळे पर्याय आहेत. त्यांचा अभ्यास करूनच निर्णय होईल. घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही आणि महापालिकेचे नुकसान होऊ दिले जाणार नाही.
- अभिषेक कृष्ण, आयुक्त, मनपा