नाशिक तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बोलबाला

By admin | Published: February 24, 2017 12:56 AM2017-02-24T00:56:09+5:302017-02-24T00:56:23+5:30

निवडणूक : चार पैकी तीन गट व आठ पैकी पाच गणांवर विजय

NCP's leadership in Nashik taluka | नाशिक तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बोलबाला

नाशिक तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बोलबाला

Next

नाशिक : तालुक्यातील चार गट व आठ गणांच्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वाधिक तीन गट व पाच गणांवर विजय मिळवित पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता कायम राखण्यात यश मिळविले.
पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यानंतर सुरुवातीला गोवर्धन व गिरणारे गट व गणाची व नंतर पळसे व एकलहरे गट व गणाची मजमोजणी घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी उन्मेश महाजन व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री अहिरराव यांच्या उपस्थितीत १२ टेबलांवर प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांनी मतमोजणी करण्यात आली. गिरणारे गटातून राष्ट्रवादीच्या अपर्णा खोसकर यांना १० हजार ३४१ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी कॉँग्रेसच्या मंजुळाबाई गायकवाड यांना ४६७८ मते मिळून अपर्णा खोेसकर पाच हजार ६६३ मतांनी विजयी झाल्या. शिवसेनेच्या रोहिणी गायकवाड यांना २८०३, तर भाजपाच्या चंद्रभागा बेंडकोळी यांना २९३४ मते मिळाली. पळसे गटातून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगन आगळे पराभूत झाले. त्यांंना राष्ट्रवादीच्या यशवंत ढिकले यांनी पराभूत केले. पळसे गटात शिवसेनेचे जगन आगळे यांना ६३६२, राष्ट्रवादीचे यशवंत ढिकले यांना ७४४६, अपक्ष संजय तुंगार यांना ६२४४ मते मिळाली. येथून यशवंत ढिकले १०८४ मतांनी विजयी झाले. एकलहरे गटाचा सर्वात धक्कादायक निकाल राहिला. खासदार पुत्र अजिंक्य हेमंत गोडसे यांना ८४६९, सेना बंडखोर अपक्ष शंकर धनवटे यांना दहा हजार ५६०, तर कॉँग्रेसचे प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांना ४०४१ तर भाजपाचे ज्ञानेश्वर पाळदे यांना १५४३ मते मिळाले. येथून अपक्ष शंकर धनवटे २०९१ मतांनी विजयी झाले. गोवर्धन गटातून शिवसेनेचे भाऊसाहेब झोबांड यांना ५४१०, राष्ट्रवादीचे माजी सभापती हिरामण खोसकर यांना ९५५६, भाजपाचे संपत बोेंबले यांना २३६७, कॉँग्रेसचे उत्तम ठमके यांना १९४९, तर माकपाचे तानाजी जावळे यांना १९३१ मते मिळाली. गोवर्धन गटातून हिरामण खोसकर ४१४६ मतांनी विजयी झाले. (प्रतिनिधी)गणातही राष्ट्रवादीचीच बाजीतालुक्याच्या आठ पंचायत समिती गणांमध्ये सर्वाधिक पाच जागा जिंकून राष्ट्रवादीने पंचायत समिती सभापतिपदावर दावा सांगितला आहे. गिरणारे गणातून उमेदवारनिहाय मते पुढीलप्रमाणे- ज्योती डंबाळे- शिवसेना- २३७१, छाया डंबाळे- ४१७४ (राष्ट्रवादी कॉँग्रेस) मीरा गोलवड- २९१३ (कॉँग्रेस), हिरा दोबाडे- ११९५ (अपक्ष) अशी मते मिळाली. येथून राष्ट्रवादीच्या छाया डंबाळे विजयी झाल्या. देवरगाव गण- नंदा मोंढे- ११२६ (शिवसेना), कविता बेंडकोळी- ३०९१ (राष्ट्रवादी), सत्यभामा बदादे- १७४१ (कॉँग्रेस), शांताबाई मोंढे- १४६२ (अपक्ष), ढवळाबाई दोबाडे- ८४२ (मनसे), सीताबाई गभाले- १९३९ (अपक्ष) अशी मते मिळून येथून राष्ट्रवादीच्या कविता बेंडकोळी विजयी झाल्या. पळसे गण- उज्ज्वला जाधव- ३५९३ (शिवसेना), माधुरी गायधनी- १६११ (राष्ट्रवादी कॉँग्रेस), मंगला जगळे- १६१७ (भाजपा), आशाबाई धात्रक- १०६७ (मनसे), अलका धायधनी- ३३०५ (अपक्ष) अशी मते मिळून शिवसेनेच्या उज्ज्वला जाधव निवडून आल्या आहेत. सिद्धपिंप्री गण- सिंधूबाई ढिकले- २८७२ (शिवसेना), विजय कांडेकर- ४१५८ (राष्ट्रवादी), दुर्गा बोराडे- १५१६ (भाजपा), पूनम कदम- ७३१ (अपक्ष), पुष्पा ढिकले- २४०६ (अपक्ष) अशी मते पडून राष्ट्रवादीच्या विजया कांडेकर निवडून आल्या. एकलहरे गण- सचिन जगताप- ३१७९ (शिवसेना), बाळकृष्ण म्हस्के- २९४१ (राष्ट्रवादी कॉँग्रेस), चंद्रभान घुगे- १३४८ (भाजपा), विजय जगताप- ३३७४ (अपक्ष) अशी मते मिळून अपक्ष विजय जगताप येथून निवडून आले. लहवित गण- डॉ. मंगेश सोनवणे- ५३९६ (शिवसेना), विनोद जगताप- १४३८ (भाजपा), अविनाश गायकवाड- २२१० ( कॉँग्रेस), अंबादास गवारे- २०४ (भाकप), अरुण जाधव- १०२ (अपक्ष), ज्योती मोरे- ३७८९ (अपक्ष) अशी मते मिळून येथून शिवसेनेचे डॉ. मंगेश सोनवणे विजयी झाले. गोवर्धन गण- देवीदास जाधव- २०९४ (शिवसेना), ढवळू फसाळे- २८१२ (राष्ट्रवादी), बाळू बेंडकोळी- ९७२ (भाजपा), दत्ताराम बेंडकुळे- २१५१ (कॉँग्रेस), मंगेश डगळे- ६८८ (भाकप), रवींद्र मेढे- ४६३ (अपक्ष) अशी मते मिळून येथून राष्ट्रवादीचे ढवळू फसाळे निवडून आले. विल्होळी गण- तुकाराम दाते- ३१७२ (शिवसेना), रत्नाकर चुंबळे- ६५४९ (राष्ट्रवादी), अ‍ॅड. अरुण खांडबहाले- २१५७ (भाजपा) अशी मते मिळून जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचे पती रत्नाकर चुंबळे विजयी झाले.

Web Title: NCP's leadership in Nashik taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.