उत्कंठावर्धक लढतीत राष्टवादीच्या माणिकराव कोकाटे यांची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:06 AM2019-10-25T01:06:23+5:302019-10-25T01:07:08+5:30
अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव करून विधानसभेत ‘कमबॅक’ केले.
सिन्नर : अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव करून विधानसभेत ‘कमबॅक’ केले. एकदा पराभूत झाल्यानंतर पुन्हा विजयी न होण्याची सिन्नरच्या राजकीय इतिहासातील परंपरा कोकाटे यांनी खंडित केली. अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत शेवटच्या फेरीत विजयाचा निकाल जाहीर झाला.
सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. टपाली मतदानासह एकूण २४ फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीत राष्टÑवादीच्या कोकाटे यांनी १३७६ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसºया फेरीत कोकोटेंची १०८० मतांची आघाडी राहिली. ही आघाडी वाढत गेली. तिसºया फेरीअखेरीस कोकाटे ५१३० मतांनी आघाडीवर राहिले. चौथ्या फेरीत कोकाटेंची आघाडी २२७८ पर्यंत राहिली. पाचव्या फेरीत आघाडी वाढून ३८८२ झाली. सहाव्या फेरीत कोकाटेंनी पुन्हा मुसंडी मारून आघाडी ५४९० वर नेली. सातव्या आणि आठव्या फेरीत अखेरी ५३२४ मतांनी कोकाटे पुढे होते. नवव्या फेरीत आघाडी कायम ठेवून दहाव्या फेरीअखेर कोकाटेंची आघाडी ३४०९ वर आली. अकराव्या फेरीत कोकाटेंच्या आघाडीत वाढ होऊन ४०७२ मताधिक्य झाले. बाराव्या व तेराव्या, चौदाव्या, पंधराव्या, सोळाव्या फेरीअखेरी कोकाटे पाच हजाराच्या पुढे आघाडीवर होते. सतराव्या फेरीत कोकाटेंचे मताधिक्य कमी झाले मात्र कोकाटेंची आघाडी ४५० मतांची राहिली. १८व्या फेरीत ४९६ मतांनी आघाडी ठेवली. १९व्या फेरीत शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांनी कोकाटेंवर ५०५ मतांनी आघाडी घेत चुुरस निर्माण केली. कोकाटेंपेक्षा वाजे पाचशे मतांनी पुढे गेल्याने अटीतटीच्या सामना सुरू झाला. २० व्या फेरीत वाजे यांनी ३१२ मतांनी आघाडी कायम ठेवली. २१व्या फेरीत कोकाटे यांनी पुन्हा ६०० मतांनी वाजे यांच्यावर मताधिक्य घेतले. २२व्या फेरीत कोकाटे यांनी ५२० मतांनी आघाडी कायम ठेवली.
२३व्या फेरीत टपाली मतदान मोजण्यात आले. त्यात वाजे यांनी कोकाटे यांच्यावर टपाली मतदानात २५५ मतांनी आघाडी घेतली. त्यामुळे कोकाटेंची मताधिक्य केवळ २६५ राहिले होते. शेवटच्या फेरीत टाकेद गटात माणिकराव कोकाटे यांनी जोरदार मुसंडी मारत राजाभाऊ वाजे यांच्यावर २०७२ मतांनी विजय मिळविला.
विजयाची तीन कारणे...
1शेवटच्या क्षणाला राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने टर्निंग पॉइंट मिळवला. शरद पवारांची सहानुभूती व छगन भुजबळांमुळे बळकटी मिळाली.
2लोकसभा निवडणुकीत सिन्नर विधानसभेची रंगीत तालीम करून जनतेची मते आजमावून घेतली. या निवडणुकीत तालुक्यात मताधिक्य घेऊन कार्यकर्त्यांचा मोट बांधून उत्साह वाढवला.
3टाकेद गटासह पश्चिम भागात संपर्क वाढवला. सिन्नर शहराच्या पाणीप्रश्नावर आवाज उठवला.
वाजेंच्या पराभवाचे कारण...
सिन्नर शहराची पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आलेले अपयश आणि कार्यकर्त्यांचा फाजील आत्मविश्वास नडला. पूर्णत: कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांनी सत्ताधाºयांवर नाराजी दाखविली. पूर्व भागात लक्ष केंद्रित करण्याच्या नादात पश्चिम पट्ट्यावर असलेली पकड घसरली. छगन भुजबळांची कोकाटेंना साथ.
पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते
1 राजाभाऊ वाजे शिवसेना 94,939
2 राजू मोरे बसपा 761
3 मनोहर दोडके म.क्रां.सेना 285
4 विक्रम कातकाडे वंचित ब. आ. 2886
5 शरद शिंदे प्रहर जनशक्ती 321
6 किरण सारुक्ते अपक्ष 258
7 विलास खैरनार अपक्ष 238
8 रामचंद्र जगताप अपक्ष 527