राष्ट्रवादीचे गणित का फिस्कटले?

By admin | Published: March 22, 2017 01:57 AM2017-03-22T01:57:43+5:302017-03-22T01:58:03+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अध्यक्षपद खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी ठरली, तर राष्ट्रवादीला २० वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले.

NCP's mathematical fiction? | राष्ट्रवादीचे गणित का फिस्कटले?

राष्ट्रवादीचे गणित का फिस्कटले?

Next

नाशिक : जिल्हा परिषदेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अध्यक्षपद खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी ठरली, असे म्हणण्यापेक्षा भाजपाचा गाफील आत्मविश्वास आणि राष्ट्रवादीतील व्यक्तिगत राजकारण या दोन मुख्य कारणांनी केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाला पराभव पहावा लागला तर राष्ट्रवादीला २० वर्षांच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले.
शिवसेना-कॉँग्रेस आणि माकप यांची युती होण्याआधीच शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेससमोेर युतीचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा होती. मात्र भाजपाकडून नगराध्यक्षपदाला सोडचिठ्ठी देत अध्यक्षपदाकडे डोळे लावून बसलेल्या धनश्री केदा अहेर यांच्या अध्यक्षपदासाठी भाजपाने राष्ट्रवादीपुढे आघाडीचा हात केला. राष्ट्रवादीने भाजपापेक्षा जास्त संख्याबळ असल्याने अध्यक्षपद आपल्याकडेच राहील, या हेतूने आघाडीबाबत बोलणी सुरू केली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी आपल्याऐवजी भाजपाला सोबत घेत असल्याची कुणकुण लागल्यानेच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आमदार निर्मला गावित, आमदार जिवा गावित यांची भेट घेत त्यांच्यासमोर आघाडीचा प्रस्ताव ठेवला. कॉँग्रेसने वेळ न दवडता प्रस्ताव स्वीकारला तर माकपने सेनेला चर्चेत झुलवत ठेवत अखेरच्या सहा दिवसांत सोबत देण्याचा निर्णय दिला. इकडे भाजपा व राष्ट्रवादी माकप शिवसेनेसोबत जाणारच नाही, या आविर्भात होती. शेवटच्या तीन दिवसांत भाजपा-राष्ट्रवादी आघाडीने फासे फेकण्यास सुरुवात केली. पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार राहुल अहेर यांनी राष्ट्रवादी व माकपसोबत चर्चा सुरू केली. मात्र तोेवर सेना-कॉँग्रेसची आघाडी होऊन सदस्य सहलीलाही रवाना झाले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तासभर आधीपर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार मंदाकिनी बनकर यांचे पती माजी आमदार दिलीप बनकर माकप आपल्यासोबत येईल, नाही तर तटस्थ राहत आपला विजय सुकर करतील, या फाजील आत्मविश्वासात होते. माकपने गटनेते रमेश बरफ यांच्या रूपाने केवळ तटस्थता पाळत अन्य दोन सदस्यांनी चक्क सेना व कॉँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले. येथेच राष्ट्रवादी व भाजपाच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's mathematical fiction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.