चांदोरी, सायखेड्याच्या दिमतीला एनडीआरएफच्या बोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:18 AM2021-08-12T04:18:41+5:302021-08-12T04:18:41+5:30
नाशिक : पुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या सायखेडा आणि चांदोरी गावांच्या मदतीसाठी एनडीआरएफकडून मिळालेल्या बोटी उपयुक्त ठरणार आहेत. जिल्हा ...
नाशिक : पुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या सायखेडा आणि चांदोरी गावांच्या मदतीसाठी एनडीआरएफकडून मिळालेल्या बोटी उपयुक्त ठरणार आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळालेल्या या बोटी निफाड तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या असून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तेथील परिस्थिती हाताळण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे.
जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास निफाड तालुक्यातील सायखेडा आणि चांदोरी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसतो. त्यामुळे या ठिकाणी व्यापक रेस्क्यू ऑपरेशन राबवाव लागते. बोटीतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची वेळ येत असल्याने पूर परिस्थितीच्या काळात या दोन्ही गावांची अधिक काळजी घेतली जाते. या मदत कार्यास आता आणख बळ मिळणार आहे.
. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला एनडीआरएफकडून मिळालेल्या १६ लाखांच्या दोन रबरी बोटी या दोन्ही गावांसाठी निफाडला पाठविण्यात आलेल्या आहेत.
गत फेब्रुवारीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने एनडीआरएफकडे दोन रबरी बोटींची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला दोन रबरी बोटी, चार लाइफबाॅय रिंग व २४ लाइफ जॅकेट मिळाल्या आहेत. हे सर्व साहित्य निफाड तहसील कार्यालयाला देण्यात आले आहे. दरम्यान, निफाड तालुक्याला या अगोदरच दोन रबरी बोट देण्यात आलेल्या असून आता निफाडसाठी एकूण चार बोटी झाल्या आहेत.