मास्क जवळच, पण वापरणार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:15 PM2020-06-20T23:15:08+5:302020-06-20T23:15:33+5:30

नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच शहरात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने शहर हादरले आहेत. मात्र, अशा स्थितीत नागरिक आरोग्याबाबत नियमांचे पालन करण्यास तयार नाही. मास्क असूनदेखील ते तोंडावर लावणाऱ्यास टाळाटाळ करणाºया पाचशे नागरिकांना अडवून महापालिकेला ताकीद द्यावी लागली आहे.

Near the mask, but will not use! | मास्क जवळच, पण वापरणार नाही !

मास्क जवळच, पण वापरणार नाही !

Next
ठळक मुद्दे निष्काळजी नागरिकांना ताकीद : ७३ जणांकडून चौदा हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच शहरात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने शहर हादरले आहेत. मात्र, अशा स्थितीत नागरिक आरोग्याबाबत नियमांचे पालन करण्यास तयार नाही. मास्क असूनदेखील ते तोंडावर लावणाऱ्यास टाळाटाळ करणाºया पाचशे नागरिकांना अडवून महापालिकेला ताकीद द्यावी लागली आहे. याशिवाय अशाच प्रकारे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया पाचशे जणांनादेखील मनपा कर्मचाऱ्यांनी समज दिली आहे. याशिवाय मास्क न वापरणाºयांकडून गेल्या दोन ते तीन दिवसांत तब्बल दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषत: लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करताना जनजीवन सुरळीत व्हावे हा शासनाचा उद्देश असला तरी असे करताना नागरिकांनी सजगता बाळगावी अशा अटी होत्या तशाच सूचनादेखील करण्यात आल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. गेल्या ६ जून रोजी महापालिकेने अधिकृतरीत्या बाजारपेठा खुल्या केल्या असल्या तरी फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य होता. मात्र खरेदीसाठी शहरात झुंबड उडाली. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला शिवाय गर्दीतदेखील नागरिक मास्क वापरत नव्हते. त्यामुळे शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मास्क न वापरणाºयांना दोनशे रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही आरोग्य विभाग करीत असून, ७३ नागरिकांकडून चौदा हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.
शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरताना अनेकांकडे मास्क असतो, परंतु तोंडावर लावण्याऐवजी गळ्यात किंवा कानात अडकवून ठेवून निष्काळजीपणे वावरणारे अनेक नागरिक आढळले आहेत, काहींनी तर चक्कखिशात मास्क ठेवले आहेत. त्यातील सुमारे पाचशे नागरिकांना मनपाच्या आरोग्य निरीक्षकांनी ताकीद दिली आहे. अशाच प्रकारे गर्दीच्या ठिकाणीदेखील फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºयांनादेखील ताकीद देण्यात आली आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता नागरिकांनीदेखील काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना नागरिकांनीदेखील आरोग्य विषयक शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे देखील पालन करत नाही. त्यामुळे त्यांना समज देण्यात आली आहे.
- डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन.

Web Title: Near the mask, but will not use!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.