१ ऑगस्टला होणार ‘नीट’ ची परीक्षा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 01:23 AM2021-03-15T01:23:06+5:302021-03-15T01:23:51+5:30

अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट)चे वेळापत्रक जाहीर केले असून १ ऑगस्टला ही नीट होणार आहे. 

The 'Neat' exam will be held on August 1 | १ ऑगस्टला होणार ‘नीट’ ची परीक्षा  

१ ऑगस्टला होणार ‘नीट’ ची परीक्षा  

Next

नाशिक : अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट)चे वेळापत्रक जाहीर केले असून १ ऑगस्टला ही नीट होणार आहे. 
एनटीएतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाणारी यावर्षी नीट परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह तब्बल ११ भाषांमध्ये घेतली जाणारी ही  नीट परीक्षा  ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाणार असून लवकरच एनटीएतर्फे मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या जातील. या परीक्षेसाठी १५ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येईल.  वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्तरीत्या नीट परीक्षा होणार 
आहे. दरम्यान, कोरोनामुळे यंदा 
सर्वच सीईटी परीक्षा विलंबाने होत आहेत.

Web Title: The 'Neat' exam will be held on August 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.