आधुनिक लागवड तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:57 PM2019-02-18T16:57:05+5:302019-02-18T16:57:23+5:30

विनय सुपे : शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन

The need to absorb modern planting technology | आधुनिक लागवड तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज

आधुनिक लागवड तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज

Next
ठळक मुद्देसुपे यांनी विद्यापीठाने विकिसत केलेल्या नवीन सुधारित वाणांचे महत्त्व विशद केले

पिंपळगाव बसवंत : सततच्या हवामान बदलांमुळे अनियमित पिकांचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात आणि त्यांना निसर्गाशी सामना करावा लागतो. अशा आव्हानात्मक परिस्थितीत योग्य निविष्ठा व्यवस्थापन तसेच शेतक-यांनी आधुनिक लागवड तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे संचालक डॉ. विनय सुपे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळगाव बसवंत येथील कांदा-द्राक्ष संशोधन केंद्रात शेतकरी प्रशिक्षण व शिवार फेरी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी बी.जी पाटील, मंडळ कृषी अधिकारी व्ही.जी पाटील, डॉ.जितेंद्र ढेमरे, डॉ मंगेश बडगुजर, राकेश सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी सुपे यांनी विद्यापीठाने विकिसत केलेल्या नवीन सुधारित वाणांचे महत्त्व विशद केले. डॉ. मंगेश बडगुजर यांनी द्राक्ष व कांदा पिकावरील कीड नियंत्रण तसेच गांडूळ खताविषयी माहिती दिल. राकेश सोनवणे यांनी वनस्पतीशास्त्र, कांदा पिकातील रोगांचे नियंत्रण व रेसिड्यू फ्री द्राक्ष शेती विषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी बी.जी पाटील यांनी कृषी विभागातील योजनांची माहिती देताना शेतीला जोडधंदा म्हणून एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. शेतक-यांना संयोजन केंद्राच्या प्रक्षेािवरील शिवारफेरीच्या माध्यमातून पिकावरील संशोधनाची माहिती देण्यात आली. केंद्रप्रमुख डॉ. जितेंद्र ढोमरे यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: The need to absorb modern planting technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक