कौशल्यपूर्ण शिक्षण आत्मसात करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:11 AM2018-08-21T01:11:19+5:302018-08-21T01:11:52+5:30
: शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरुवातीपासून चालत आलेल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले असून, विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केले.
नाशिक : शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरुवातीपासून चालत आलेल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले असून, विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी केले. केटीएचएम महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित समाज दिन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, व्यवस्थापन समितीचे अॅड. एकनाथ पगार, डॉ. डी. काजळे, डॉ. आर. डी. दरेकर आदी उपस्थित होते. डॉ. धनंजय माने म्हणाले, आजचा विद्यार्थी हा मोबाइल आणि इंटरनेटमध्ये अडकून पडला आहे. उपलब्ध असलेल्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ करून घेतल्यास त्यांचा बौद्धिक विकास होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार व प्रा. तुषार पाटील यांनी केले. डॉ. एम. बी. मत्सागर यांनी आभार मानले.
जनता विद्यालय मातोरी
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने समाजदिनी कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या कार्यावर भाषणे केली. याप्रसंगी मुख्याध्यापक कापडणीस यांनी अटलबिहारी वाजपेयी व कर्मवीरांच्या कार्याविषयी माहिती आपल्या भाषणातून दिली. यावेळी शालेय कमिटी अध्यक्ष सुरेश पिंगळे, अॅड. दत्तात्रय पिंगळे, तुकाराम पिंगळे, अभिनव बालविकासचे मुख्याध्यापक व्ही. के. सोनवणे, थेटे, भाऊसाहेब भामरे, डी. आर. पाटील, पी. एस. देवरे, दीपक हगवणे, बाळासाहेब पिंगळे, केरू हगवणे, रामदास सूर्यवंशी उपस्थित होते.
मराठा हायस्कूलमध्ये समाज दिन साजरा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस समाज दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी सदस्य डॉ. शैलेंद्र गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार प्रतापदादा सोनवणे होते. व्यासपीठावर जगन्नाथ तिदमे, उत्तमराव मुळाणे, संपतराव मोरे, सुनील निरगुडे, अशोक जाधव, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सदस्य शुक्लेश्वर वर्पे, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा पिंगळे, उपमुख्याध्यापक सोपान शिंदे, पर्यवेक्षक निवृत्ती बोराडे, सुरेश सोमवंशी, अशोक ठुबे उपस्थित होते.
४कार्यक्र माची सुरुवात समाजगीत गायनाने करण्यात आली. गीतमंचाने संगीत शिक्षक दिनकर दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजगीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांनी सादर केले. प्रतापदादा सोनवणे यांनी भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली म्हणून वाजपेयी यांच्या दोन कविता सादर केल्या. सूत्रसंचालन कल्पना दरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सुरेश सोमवंशी यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.